Homeताज्या बातम्यापंढरपूरमधील सकल लोहार समाजाचे अन्नत्याग उपोषण यशस्वीरीत्या स्थगित; शासनाकडून पाठिंबा मिळाल्यानंतर आंदोलनाची...

पंढरपूरमधील सकल लोहार समाजाचे अन्नत्याग उपोषण यशस्वीरीत्या स्थगित; शासनाकडून पाठिंबा मिळाल्यानंतर आंदोलनाची यशस्वी वाटचाल!

पंढरपूर (दि. २ ऑक्टोबरपासून सुरू):
पंढरपूर येथे सकल लोहार समाजाच्या वतीने आरक्ष व विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आलेले आमरण/अन्नत्याग उपोषण अखेर विविध आजी-माजी आमदारांच्या पाठिंब्यानंतर आणि प्रशासकीय व शासन स्तरावरील सकारात्मक चर्चालीन भूमिकेनंतर आज अधिकृतपणे स्थगित करण्यात आले आहे.
​आंदोलनाला मिळालेली गती आणि राजकीय पाठबळ:
उपोषण सुरू असताना पंढरपूरच्या नगराध्यक्षा तथा प्रथम नागरिक सौभाग्यवती प्रणिताई भगीरथ भालके यांनी उपोषणकर्ते श्री. दादासाहेब कळसाईत यांची उपोषण स्थळी भेट घेतली, ज्यामुळे आंदोलनाला नवी गती मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘रस्ता रोको’ आंदोलनानंतर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदारांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी येऊन अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच आमदारांनी आपापल्या लेटरपॅडवर पाठिंब्याची पत्रे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली.
​शासकीय व प्रशासकीय हालचाली:
तहसीलदारांनी दिवसभरात तब्बल ४ वेळा उपोषण स्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांना दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांची भेट घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट दिली.
​समाजबांधवांचे आणि नेतृत्वाचे आभार:
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील लोहार समाजाच्या विविध संस्था, संघटना आणि बंधुभगिनींनी स्वतःच्या लेटरपॅडवर जाहीर पाठिंबा दिला. अनेक कार्यकर्त्यांनी १ ते ७ दिवस आपले सर्व कामधंदे बंद ठेवून उपोषण स्थळी मुक्काम केला आणि आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. याबद्दल सकल लोहार समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
​”लढाई अजून बाकी आहे!”
हा विजय केवळ एका आंदोलनाचा नसून तमाम महाराष्ट्र राज्यातील लोहार समाजाच्या एकजुटीचा आणि निष्ठेचा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, “लढाई अजून संपलेली नाही, ती पुढेही चालूच राहील,” असा इशाराही समाजबांधवांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

error: Content is protected !!