पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल फौजदारी याचिकेची सुनावणी
पुणे –
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे महानगरपालिकेची फसवणूक करणारे राकेश विटकर तसेच कार्यरत असताना मद्यपानाच्या अमलाखाली कार्य करीत असल्याचे गंभीर आरोप असलेले रविंद्र सोनवणे यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
ही सुनावणी न्यायालयात होणार असून, संबंधित आरोपांच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, गैरप्रकार व शिस्तभंगाच्या गंभीर आरोपामुळे या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागरिकांच्या तक्रारींवर आधारित ही कारवाई होत असल्यामुळे पुणेकरांचे याकडे लक्ष लागलेले आहे.
➡️ सुनावणी दिनांक: ०३/१०/२०२५
➡️ ठिकाण: पुणे न्यायालय

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.






















