Homeताज्या बातम्यापोलीस वर्धापन दिन व पत्रकार दिनानिमित्त लोणी काळभोरमध्ये पोलीस–पत्रकार क्रिकेट सामना

पोलीस वर्धापन दिन व पत्रकार दिनानिमित्त लोणी काळभोरमध्ये पोलीस–पत्रकार क्रिकेट सामना

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त २ ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लोणी काळभोर पोलिस स्टेशन व पंचक्रोशीतील पत्रकार यांच्यात आज दुपारी एमआयटी मैदानावर मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना रंगला.
या सामन्याचे उद्घाटन परिमंडळ ६ चे पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान बाबर, पोउनि सोनटक्के, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून लोणी काळभोर पोलिस संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार संघाकडून चांगला प्रतिसाद देत सामना चुरशीचा झाला. सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार योगेश उदले यांना प्रदान करण्यात आला.
या सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी हवेली डॉक्टर्स असोसिएशन तसेच अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर व डॉ. रतन काळभोर यांनी मोलाचे सहकार्य केले.
पोलीस व पत्रकार यांच्यातील सुसंवाद, सलोखा आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी हेल्मेट परिधान करून भाजपची धमकी दिली आहे. पुणे बातम्या

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

HC-नियुक्त प्रशासकाची अवहेलना करण्यावरून AITA अंतरिम पॅनेल कायदेशीर पेचात | पुणे बातम्या

पुणे : अखिल भारतीय टेनिस असोसिएशनची (एआयटीए) अंतरिम कार्यकारी समिती दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकाला सहकार्य करण्यास नकार दिल्याने कायदेशीर...

चंदननगरमध्ये मारहाण करून मोबाईल पळवणारे तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे: रस्त्यावरून गाडी नीट चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास...

पुणे पोलिसांची धडक कारवाई: इन्स्टाग्रामवरून पिस्टल विकणारा सराईत गुन्हेगार लातूरमधून अटक; ५ गावठी पिस्टल...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या खंडणी विरोधी पथक-२ ने एक मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावरून अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: येवलेवाडी परिसरात तब्बल पावणेसात लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह आरोपी जेरबंद!

पुणे: शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पुणे शहराच्या येवलेवाडी पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले...

error: Content is protected !!