Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई: सराईत आरोपीकडून १ तीनचाकी रिक्षा व १...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई: सराईत आरोपीकडून १ तीनचाकी रिक्षा व १ दुचाकीसह अडीच लाखांचे मुद्देमाल जप्त; तीन गुन्हे उघडकीस

पुणे:
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत वाहन चोराला जेरबंद करण्यात यश मिळवले असून, त्याच्याकडून १ तीनचाकी रिक्षा आणि १ युनिकॉर्न दुचाकी अशी एकूण अडीच लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगाराकडील वाहन चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
​प्राप्त माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर हे वाहन चोरांचा शोध घेत होते. गस्त घाजत असताना पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम चोरीची रिक्षा घेऊन सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे थांबला आहे.
​या माहितीच्या आधारे नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे छापा टाकला. तिथे आरोपी चेतन राजु जाधव (वय २६ वर्षे, रा. सुरज दर्शन सोसायटी, राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार, पुणे) हा तीनचाकी रिक्षा (क्रमांक MH 12 FC 2270) सह मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरची रिक्षा त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली, ज्यामुळे ती रिक्षा जप्त करण्यात आली. नमूद आरोपीकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी गाडी (क्रमांक MH 12 SJ 5124) देखील चोरल्याचे निष्पन्न झाले, जी पोलिसांनी तात्काळ जप्त केली आहे.
​जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपशीलवार माहिती:अ.क्र.गुन्हे नोंद क्रमांक (गुरनं)कलमजप्त वाहनकिंमत (अंदाजे)
१३४२/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)रिक्षा नंबर MH12FC2270१,५०,०००/- रु.
२३४३/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)युनिकॉर्न दुचाकी गाडी MH12SJ5124१,००,०००/- रु.
एकूण——आरोपी पाहिजे असलेले इतर गुन्हे:
​नमूद आरोपी हा खालीलप्रमाणे इतर ३ गुन्ह्यांमध्ये हवा (पाहिजे) होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:अ.क्र.गुन्हे नोंद क्रमांक (गुरनं)कलम
१३१८/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)
२३१९/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)
३४७४/२०२५भा.न्या.सं.क. ३०३(२)पोलीस पथक व मार्गदर्शन:
​सदरची ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांच्या सूचनांप्रमाणे, पोलीस उप-निरेक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!