Homeताज्या बातम्याभ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप विरुद्ध शिवसेना – प्रभाग २७ ड मध्ये लढत तीव्र

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप विरुद्ध शिवसेना – प्रभाग २७ ड मध्ये लढत तीव्र

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप विरुद्ध शिवसेना – प्रभाग २७ ड मध्ये लढत तीव्र

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या उमेदवारीवर शिवसेनेची अधिकृत हरकत , निवडणूक निर्णय अधिकारी पेचात .

पुणे :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट लढत रंगणार आहे. शिवसेनेच्या वतीने अनंत घरत यांना आक्रमक उमेदवार म्हणून मैदानात उतरविण्यात आले असून, त्यांच्यामुळे प्रभाग २७ मधील निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे.

प्रभाग २७ मध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून व्यायामशाळा भ्रष्टाचार, वीजचोरी, तसेच पुणे महानगरपालिकेची परवानगी नसताना अनधिकृतरीत्या व्यायामशाळा व कार्यालय ताब्यात घेऊन पक्ष कार्यालय चालविण्याबाबत गंभीर तक्रारी समोर आलेल्या आहेत. असे असतानाही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घाटे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंत घरत यांनी सर्व संबंधित कागदपत्रे व पुराव्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे धीरज घाटे यांच्या उमेदवारीवर अधिकृत आक्षेप अर्ज दाखल केला आहे.

यासंदर्भात बोलताना अनंत घरत म्हणाले,
“आपण ज्या संस्थेची निवडणूक लढवितो, त्याच संस्थेची फसवणूक केली असल्यास त्या व्यक्तीस निवडणूक लढविण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार राहात नाही. धीरज घाटे यांनी स्वतः तसेच मंडळाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची फसवणूक केली असून, याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.”

घरत पुढे म्हणाले की, या प्रकरणी सागर धाडवे यांनी पुणे येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात मिस्सेलानियस फौजदारी याचिका क्रमांक ५७००/२०२५ दाखल केली आहे. तसेच ज्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हा प्रकार घडला, त्या मंडळाविरोधात धर्मादाय आयुक्त न्यासाकडेही प्रकरण दाखल असून न्यासाने मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांना ५,००० रुपयांचा दंड ठोठावलेला आहे.

“अशा परिस्थितीत, जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत धीरज घाटे यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करावे. लोकशाही मूल्यांचे व संविधानाचे रक्षण करणे ही निवडणूक यंत्रणेची जबाबदारी आहे,” अशी ठाम भूमिका अनंत घरत यांनी मांडली.

भ्रष्टाचार, कायद्याचे उल्लंघन आणि नैतिकतेचा प्रश्न या मुद्द्यांवरून प्रभाग २७ मधील निवडणूक आता अधिकच लक्षवेधी ठरणार असून, मतदारांचे लक्ष या लढतीकडे वेधले गेले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हे पेचात पडले असून त्यांनी सदर आक्षेपाला उद्या उत्तर देतो असे कळविले आहे , ही हरकत घेतल्या नंतर विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयासमोर अचानक भाजप घाटे समर्थकांनी शेकडो ने गर्दी केली तसेच पोलिसांनी ही मोठा फौज फाटा तैनात केला होता.
सदर प्रकरणात धीरज घाटे यांचा अर्ज बाद होण्याची दाट शक्यता असून यामुळे मनपा प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांवर राजकीय दबाव येऊ शकतो असे घरत म्हणाले.
यावेळी घरत यांनी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता,...

खडकी बाजार, दर्गाह वसाहत परिसरातील मशिदीवरील हल्ल्याचा मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनकडून तीव्र निषेध; शांतता, बंधुभाव आणि कायद्याच्या राज्याचे पालन करण्याचे आवाहन पुणे, दि. २२ जून...

पुणे महापालिकेत विरोधी नगरसेवकांनी हेल्मेट परिधान करून भाजपची धमकी दिली आहे. पुणे बातम्या

विरोधी नगरसेवक सभागृहात हेल्मेट घालतात पुणे: भाजप सदस्यांच्या “आक्रमक आणि धमकावणाऱ्या” वागणुकीला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) च्या विरोधी नगरसेवकांनी बांधकाम...

error: Content is protected !!