Homeक्राईममटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक, वय -७२ वर्षे, राह-३७० शुक्रवार पेठ, पुणे...

मटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक, वय -७२ वर्षे, राह-३७० शुक्रवार पेठ, पुणे यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्द केले …

खडक पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगार मटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक, वय -७२ वर्षे, राह-३७० शुक्रवार पेठ, पुणे यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्द केले …

पुणे शहरातील वाढते मटका, जुगार, अवैध दारु इत्यादी अवैध धंद्यांना आळा बसविण्याकरिता व नजिकचे काळामध्ये येणारे सण निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहेत.

त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्ट्ल मटका किंग गुन्हेगार नामे नंदकुमार बाबुराव नाईक, वय ७२ वर्षे, राह-३७० शुक्रवार पेठ, पुणे याचे विरुध्द खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एकुण ६३ गुन्हे दाखल असुन सन २०२१ पासुन खडक पोलीस स्टेशन येथे अवैध मटका व जुगाराचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्ध इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी त्याचे जुगार अड्यावर वेळोवेळी छापा कारवाई केली असतानाही स्थानबध्द इसमाच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती. त्याच्या अवैध जुगार अड्यामुळे पुणे शहरातील रोजंदारीवर काम करणारे तरुण, नोकरदार तसेच आसपासच्या परिसरातील तरुण हे जुगारीचे व्यसनात अडकले होते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कुटुंब उद्धस्त झालेले आहे. म्हणुन श्री. शशिकांत चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर यांनी दिनांक १७/०३/२०२५ रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन कडून त्यास स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदर कारवाई श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर, श्रीमती. अनुजा देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. शशिकांत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती. शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सव्हॅलन्स पथकातील हर्षल कदम, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार / ६६३५ संतोष थोरात, पोलीस शिपाई/९९४० चंद्रशेखर खरात, पोलीस शिपाई/५१६३ ईरफान नदाफ यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवुन प्रस्ताव तयार केलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!