Homeताज्या बातम्यामोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन : “एक पेढा भ्रष्टाचाराचा” देत सरकारला झोंबता हल्ला!

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन : “एक पेढा भ्रष्टाचाराचा” देत सरकारला झोंबता हल्ला!

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन :
“एक पेढा भ्रष्टाचाराचा” देत सरकारला झोंबता हल्ला!

पुणे :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत चोरीचा, एक पेढा खड्ड्यांचा, एक पेढा महागाईचा” अशा घोषणा देत पेढे आणि गाजर वाटले.

आंदोलनाची सुरुवात कसबा गणपतीची आरती करून करण्यात आली. यावेळी “मोदींना सुबुद्धी मिळावी आणि देशाचे भले व्हावे” अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की,
“आज भाजप ही जुमला पार्टी बनली असून मतदारांची फसवणूक झाली आहे. देशात महागाईने उच्चांक गाठलेला आहे, पुणेकर खड्ड्यांनी हैराण आहेत, मत चोरी सुरू आहे आणि भ्रष्टाचारी आमदार सत्तेचा मलिदा खात आहेत. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ ही घोषणा फसवी ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी सत्तेवरून पायउतार व्हावे हीच आमची मागणी आहे.”

या आंदोलनाला शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत संदीप गायकवाड, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण राजेश मोरे चंदन साळुंखे हेमंत यादव निलेश वाघमारे नंदू येवले संतोष भुतकर अनिल परदेशी गिरीश गायकवाड रुपेश पवार दत्ता घुले ज्ञानंद कोंढरे शैलेश जगताप विकी धोत्रे नागेश खडके विलास कथलकर रमेश परदेशी सूर्यकांत पवार अमोल घुमे सचिन चिंचवडे जुबेर शेख नितीन निगडे पंढरीनाथ कांबळे अभिषेक जगताप हरिश्चंद्र सपकाळ संदीप महापदी विजय रावडे नितीन रावळेकर विकास राऊत बाळासाहेब गरुड सोनू पाटील अंकित अहिरे अनिल जाधव राहुल शेडगे बकुळ दाखवे, पंकज बरीदे अमित जाधव जितेंद्र निजामपूरकर हर्षद बडगुजर प्रमोद गाढवे, संजय वाल्हेकर शिवप्रसाद जठार शिरीष कोल्हटकर मोहन धामणकर सुरज मोराळे मोहन पांढरे प्रमोद पारधे निखिल खोडे नितीन दलभंजन मिलिंद पतकी
युवा सेनेचे शहर संघटक सनी गवते सोहम जाधव परेश खांडके चिंतामण मुंगी अक्षय रावळ मिरज नांगरे सुरेश आढाव
महिला आघाडीच्या पद्मा सोरटे निकिता मारटकर स्वाती कथलकर अमृत पठारे सुनिता खंडाळकर जयश्री भंडगे रोहिणी कोल्हाळ वैशाली दारवटकर विजया मोहिते रोहिणी मडोळे मृण्मयी लिमये स्मिता पवार महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“एक पेढा भ्रष्टाचाराचा… एक पेढा महागाईचा… जनता हैराण, मोदींनी पायउतार व्हावं” ही आंदोलनाची मुख्य मागणी होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

error: Content is protected !!