पुणे | प्रतिनिधी
लाल देवल परिसरातील हजरत मोहम्मद सिद्दीक शाह बाबा (रह.) मछलीवाली दर्गा शरीफ येथे दि. 19 व 20 रोजी उर्स मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. उर्सनिमित्त दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळपासूनच जियारत, चादर अर्पण आणि दुआसाठी भाविकांची रांग लागलेली दिसून आली.
या पवित्र उर्स सोहळ्यादरम्यान पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दर्ग्याचे ख़ादिम श्री संतोषभाई विनोद चव्हाण यांना विशेष पशस्ति प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमात
आर. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री इरफान भाई सय्यद,
श्री नितिन भाई बालकी,
आणि श्री अजीज कादरी चिस्ती साहेब
यांनाही मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला.
उर्सनिमित्त दोन दिवसांचा भंडारा (सामूहिक अन्नदान) आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. समाजातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
आज सायंकाळी देखील सर्वांना दर्ग्यावर येऊन जियारत करण्याचे आणि भोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण – लाल देवल, रोझरी स्कूल समोर, कॅम्प, पुणे.
उर्स सोहळ्यामुळे लाल देवल परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, शांतता व सुव्यवस्थेसाठी स्थानिक स्वयंसेवक आणि प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























