Homeताज्या बातम्यावानवडीत रिक्षाला धडक देऊन अल्पवयीन शाळकरी मुलींसह रिक्षाचालकाला जखमी करणाऱ्या कारचालकावर गुन्हा...

वानवडीत रिक्षाला धडक देऊन अल्पवयीन शाळकरी मुलींसह रिक्षाचालकाला जखमी करणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल

पुणे:
पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉन्ग साईडने भरधाव वेगात येऊन शाळकरी मुलींच्या रिक्षाला धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रिक्षाचालक आणि शाळकरी मुली किरकोळ जखमी झाल्या असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
​घटनेची थोडक्यात माहिती:
​पोलीस स्टेशन: वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
​गुन्हा नोंद: गु.र.नं. ४७६ / २०२६
​कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), ३२४(४) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १११९/१७७ नुसार.
​घटना वेळ व ठिकाण: दिनांक २९/०९/२०२६ रोजी रात्री २१:०० वाजल्यापासून ते दिनांक ३०/०९/२०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजेच्या सुमारास, एसआरपीएफ (SRPF) ग्रुप नं. १ रोडवर, बालाजी किराणा दुकानसमोर, वानवडी, पुणे.
​गुन्हा दाखल वेळ: दिनांक ३०/०९/२०२६ रोजी सकाळी ११:१२ वाजता.
​फिर्यादी आणि आरोपी तपशील:
​फिर्यादी: प्रदीप दत्तात्रय जकाते (वय ४५ वर्षे, व्यवसाय: रिक्षाचालक, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे, मो.नं. ९८५०५०४१३५).
​आरोपी चालक: अभिजित महादेव राऊत (वय अंदाजे ३२ वर्षे, रा. मु.पो. परेंची, तालुका पुरंदर).
​अपघाताची सविस्तर हकीकत:
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जकाते हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक (एमएच १२ टीयू ९३६१) मध्ये शाळकरी मुलींना बसवून त्यांना साधना शाळेत घेऊन जात होते. दरम्यान, वरील नमूद ठिकाणी आले असता, चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १२ यूएस ९०९९) चा चालक आरोपी अभिजित महादेव राऊत याने आपले वाहन हयगयीने व निष्काळजीपणे रॉन्ग साईडने चालवून फिर्यादीच्या रिक्षाला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
​या धडकेमुळे रिक्षा पलटी झाली, ज्यामुळे फिर्यादी रिक्षाचालक आणि रिक्षामधील शाळकरी मुलींना किरकोळ दुखापत झाली. तसेच, या अपघातात फिर्यादीच्या रिक्षाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फिर्यादीच्या जबाबावरून वानवडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

बोपोडीतील वादग्रस्त ‘अॅनिमल इन्सिनरेटर’ प्रकल्प: नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आणि तीव्र रोष

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मनमानी कारभाराचा आणि नियोजनाचा फटका आता पुन्हा एकदा उपनगरांना बसू लागला आहे. बावधन येथील तीव्र विरोधामुळे रखडलेला मृत प्राण्यांच्या दहनाचा प्रकल्प...

“७ अनाधिकृत होर्डिंग्ज नक्की कोण वाचवत आहे.? तक्रारीनंतरही आकाशचिन्ह विभाग मौन की मूक पाठिंबा?”

पुणे:- पुणे शहरातील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा विषय पुणे महानगरपालिकेसाठी तापदायक ठरत असतानाच, प्रशासनाकडून काही ठराविक प्रकरणांमध्ये कारवाईबाबत जाणीवपूर्वक मौन धारण करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार...

error: Content is protected !!