Homeताज्या बातम्याशरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

पुणे (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६ ; कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा गुन्हा पूर्वनियोजित असून संघटित पद्धतीने रचण्यात आला आहे. आरोपींनी एकत्र येऊन थंड डोक्याने कट रचून हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी तपासातून स्पष्ट होते.त्यामुळे आरोपींची भूमिका केवळ गौण असल्याचा दावा हा दिशाभूल करणारा आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला.

मोहोळ खून प्रकरणात चार आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी नितीन खैरे, आदित्य गोळे, अभिजित मानकर आणि ॲड. संजय उडान यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना राज्य सरकार तसेच मुख्य तक्रारदारांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला.

राज्याच्या वतीने या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी बाजू मांडली. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यास मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तपासातील कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी गुन्ह्याचे स्वरूप व आरोपींचा सक्रिय सहभाग सिद्ध होत असल्याचे ॲड. राजपूत यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत जामीन मंजूर करणे न्यायाच्या तत्त्वांना बाधक ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची, पुरावे नष्ट करण्याची किंवा साक्षीदारांना धमकावण्याची ठोस शक्यता असल्याचेही न्यायालयास सांगण्यात आले. आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित टोळीशी असलेले संबंध लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही सरकार पक्षाने अधोरेखित केले. आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला.

शरद मोहोळचा पाच जानेवारी २०२४ ला सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. वर्चस्वाच्या वादातून गणेश मारणे टोळीने हा खून केल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्यातील १५ आरोपींसह गणेश मारणेवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे.

*पुढील सुनावणी सात मार्चला*
मुख्य तक्रारदारांच्या वतीने ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. संकेत राव, ॲड. सोहम यादव आणि ॲड. तेजस सावंत यांनीही आरोपींच्या जामीन अर्जांना तीव्र विरोध केला. या हत्येमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा गंभीर गुन्ह्यात आरोपींना जामीन देणे समाजात चुकीचा संदेश देणारे ठरेल, असे त्यांनी नमूद केले. जामीन अर्जावर पुढील सुनावणी सात मार्चला होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण, न्याय एक न संपणारी प्रतीक्षा: डेटा | पुणे...

पुणे : महाराष्ट्रात दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे राज्यातील 2023 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हे फक्त नोंदवलेले आकडे आहेत....

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

error: Content is protected !!