पुणे शहर (दि. ०६):
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घाजत असताना मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे धारदार लोखंडी शस्त्रे बाўगणारा एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण ८,५००/- रुपये किमतीची १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
घटनेची पार्श्वभूमी:
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना आणि पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी व महेश मंडलिक यांना गोपनीय बातमी मिळाली की, राम मंदिराच्या पाठीमागे, गल्ली नंबर ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे येथे गौरव कांबळे हा त्याच्या ३ मित्रांसोबत बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे घेऊन थांबलेला आहे.
पोलीस कारवाई:
मिळालेली गोपनीय बातमी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने जनता वसाहत, पर्वती, पुणे येथून मुख्य आरोपी गौरव राजू कांबळे (वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे) यास त्याच्या ३ विधीसंघर्षित साथीदारांसह शस्त्रांसह ताब्यात घेतले.
या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन पुणे येथे १ आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा रजि. क्रमांक २५३/२०२६ नुसार आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मार्गदर्शन व कारवाई करणारे पथक:
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मार्गदर्शक: अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे.
कारवाई करणारे पथक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म. पोलीस उप-निरीक्षक तेजश्री, तसेच पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, संदिप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे आणि विनायक वगारे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























