सॅलरी पार्क परिसर, प्रभाग क्रमांक २१ येथेबॅनर युद्ध सुरू आहे का? – मुकुंद नगरातील सॅलरी पार्क परिसरात तणावाचे वातावरण
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील मुकुंद नगर – सॅलरी पार्क परिसर, प्रभाग क्रमांक २१ येथे सध्या उघडपणे “बॅनर युद्ध” सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले असून, यामुळे सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “मराठा समाजावर अन्याय का?” असा थेट सवाल उपस्थित करणारे बॅनर सार्वजनिक ठिकाणी झळकू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मराठा समाजावर अन्याय झाला तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाच्या भावना दुखावल्या जात असताना, या प्रकारामागे नेमका कोणाचा उद्देश आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.
कोणी काढले? – प्रशासनाकडे उत्तर नाही
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, कोणी काढले, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि त्यानंतर अचानक कोणी हटवले यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ओपन गटात ओबीसी समाजाचा समावेश का – आरक्षणावर थेट सवाल
या वादाला आणखी धार देणारा मुद्दा म्हणजे —
“ओपन गटात ओबीसी समाजाच्या उमेदवाराला प्रधान का?” असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राज्यात ओबीसी आरक्षण अस्तित्वात असताना, काही ठिकाणी नियमबाह्य व पक्षपाती निर्णय घेतले जात आहेत का, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
आरक्षित जागेवरून वाद अधिक चिघळतोय
सॅलरी पार्क परिसरातील आरक्षित (Reserved) जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच, त्यावरून समाजांमध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. मराठा समाजाचे प्रश्न अद्याप सुटले नसताना, त्यावर पडदा टाकण्यासाठी नवे मुद्दे पुढे आणले जात आहेत, अशी भावना समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























