Homeताज्या बातम्यामंगळवार पेठेत फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; नागरिकांचा मार्ग अडला, पीएमसीकडे तक्रार

मंगळवार पेठेत फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; नागरिकांचा मार्ग अडला, पीएमसीकडे तक्रार

मंगळवार पेठेत फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; नागरिकांचा मार्ग अडला, पीएमसीकडे तक्रार

पुणे | प्रतिनिधी
मंगळवार पेठ, जुना बाजार रोड परिसरात फुटपाथ/पादचारी मार्गावर बेकायदेशीर बांधकाम करून वाचनालय उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बांधकामामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर आधीच वाहतुकीने गजबजलेला असून दर रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होते. दोन्ही बाजूंना दुकाने व अतिक्रमण असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अशातच फुटपाथवर उभारण्यात आलेल्या वाचनालयाच्या बांधकामामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे बाधित झाला आहे.
📍 पोलिस चौकीजवळच अतिक्रमण
सदर बांधकाम हे पोलिस चौकीच्या जवळ असूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याचा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिसरात पीएमपीएमएल बसस्थानक देखील असल्याने प्रवाशांना रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.
📸 छायाचित्रातून स्पष्ट वास्तव
उपलब्ध छायाचित्रांमध्ये फुटपाथलगत उभारलेले बांधकाम, बाजूला साचलेला कचरा व अडथळे स्पष्ट दिसत आहेत. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
📑 तक्रार अर्ज सादर
या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम) तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कलम २१ अंतर्गत दिलेल्या निर्देशांनुसार पादचारी मार्ग मोकळा ठेवणे बंधनकारक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
⚖️ तातडीने कारवाईची मागणी
नागरिकांनी फुटपाथवरील अतिक्रमण तात्काळ हटवून पादचारी मार्गाची सुरक्षा व संरक्षण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उच्चस्तरीय तक्रार व आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
📰 Crime Maharashtra Live News
✍️ प्रतिनिधी – आमिर मोहम्मद शेख
📍 पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

आजोबांनी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा निषेध केला. पुणे बातम्या

पुणे: रात्री 6 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवावर (9) झोपडीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या विरोधात मंगळवारी रात्री अनेक शहरवासीयांनी पर्वती आणि...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप; पुणे न्यायालयाचा निकाल

पुणे: पुणे शहरातील एका अत्यंत क्रूर आणि खळबळजनक खुन खटल्याचा निकाल लागला असून, स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली...

error: Content is protected !!