Homeताज्या बातम्याआळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न.

आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न.

आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न.

मौजे आळंदी म्हातोबा, ता. हवेली, जि. पुणे येथे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे यांच्या माध्यमातून, श्री म्हातोबा जोगेश्वरी मंदिर पालखी मार्ग रस्ता सुधारणा करणे, या १० लक्ष रू कामाचा भूमिपूजन समारंभ काल मंगळवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. गेली अनेक वर्षांपासून या पालखी मार्गाचे काम प्रलंबित होते. येथील ग्रामस्थांनी याबाबत युवराज काकडे यांच्याकडे मागणी केली होती. ही मागणी तात्काळ मान्य करून युवराज काकडे यांनी १० लक्ष रू निधी उपलब्ध करून दिला.आळंदी येथील म्हातोबा जोगेश्वरी मंदिर देवस्थानच्या पालखी मार्गाचे भुमिपूजन संपन्न.

या प्रसंगी आरोग्यदूत युवराज काकडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना, आळंदी गावच्या भविष्यातील महत्त्वाच्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. यामध्ये गावासाठीची ड्रेनेज लाईन STP योजना, कुंजीरवाडी- आळंदी मुख्य रस्ता, म्हातोबा मंदिर पुढील काळात (क) वर्गात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न, मल्हारगड पर्यटन क्षेत्र म्हणून विकास, विठ्ठल मंदिराजवळील नाला खोलीकरण, आरोग्य विषयक उपक्रम अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.

यावेळी युवराज काकडे यांनी आळंदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पुढील वर्षभर पुरतील येवढी, १ लक्ष रुपयांची गोळ्या औषधे उपलब्ध करून दिली. तसेच गावातील नागरिकांच्या आरोग्याविषयी सर्व चांगल्या सेवा सुविधा पुढील काळातही उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले.

कार्यक्रमास दिलीप वाल्हेकर, अशोक जवळकर, संदेश आव्हाळे, भगवान जवळकर, मोहन जवळकर, दत्तात्रय जवळकर, शंकर जवळकर, वाल्मिक जवळकर, रतन झेंडे, भाऊसाहेब कुंजीर, संदीप पवार, श्रीपाद जवळकर, राजेश जवळकर, तेजस शिवरकर, गणेश जवळकर, योगेश जवळकर, राहुल जवळकर, अमित पवार, सागर पवार, ज्ञानेश्वर जवळकर, बाळासाहेब शिवरकर, विजय सुर्वे, गणपत जवळकर, कैलास खटाटे, दयानंद शिवरकर, दशरथ जवळकर, सखाराम जवळकर, श्रीहरी काळभोर, योगेश काकडे, प्रतिक शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या भुमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून, गावच्या सर्वांगीण विकासाची ही महत्वाची शिदोरी असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त करून, युवराज काकडे यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!