Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला पकडून २४ तासांत त्याचेवरील चार्जशीट हडपसर पोलिसांनी...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला पकडून २४ तासांत त्याचेवरील चार्जशीट हडपसर पोलिसांनी कोर्टात दाखल

पुणे- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला पकडून २४ तासांत त्याचेवरील चार्जशीट हडपसर पोलिसांनी कोर्टात दाखल केले .आणि गतिमान तपासाची झलक प्रतीत केली .हडपसर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी संबधित गंभीर गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा केले.पुरावे भक्कम करून केवळ २४ तासांच्या आतच आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

दिनांक ०९/१०/२०२५ रोजी यातील फिर्यादी माळवाडी येथून गाडीतळ हडपसर असा प्रवास करीत असताना अग्रवाल स्वीट, सोलापूर रोड, गाडीतळ हडपसर पुणे येथे एका रिक्षामध्ये बसल्या असता रिक्षाचालकाने फिर्यादी यांना घाणेरड्या व अश्लिल पध्दतीने हात लावला. या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न झाली. सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं ८६६/२०२५ भा. न्या. सं.क. ७४ सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन, आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे)निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेड व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले.
तपास पथकाने घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर संशयीत आरोपी शैलेश गुंडराव पाटील वय २९ वर्ष रा. मांजरी पुणे याची ओळख पटवून त्यास ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेड, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अमित साखरे, बापु लोणकर, अभिजीत राऊत, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, विनोद शिर्के, संभाजी म्हांगरे, स्वप्नाली मोरे, मिरा रंदवे, साधना राठोड, पुनम खामकर व अमोल जाधव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

error: Content is protected !!