सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम; पुष्पहार व वह्यावाटप कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी, क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
दि. ३/१/२०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम पंजेतन पवित्र संघटना यांच्या वतीने पार पडला.
या प्रसंगी पंजेतन पवित्र संघटनेच्या पुणे शहर महिला उपाध्यक्ष कु. फिजा अल्ताफ शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनिफभाई शेख, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मतीन मदार तसेच घोरपडी बाजार प्रमुख कुमारभाई पिल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक आमिरभाई शेख यांचीही उपस्थिती होती.
यानंतर सायंकाळी गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनिफभाई शेख यांच्या हस्ते लहान मुलींना वह्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी घोरपडी पेठ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विशाल गद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमात लहान मुलींनी शिक्षणावर आधारित सुंदर गाणे सादर केले. तसेच त्यांच्या वर्गशिक्षिका राखी रासकर यांनी प्रेरणादायी विचार मांडले. उपस्थित मान्यवरांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
—

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























