Homeताज्या बातम्याखोटी बनावट पेमेन्ट स्लिपद्वारे न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

खोटी बनावट पेमेन्ट स्लिपद्वारे न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

खोटी बनावट पेमेन्ट स्लिपद्वारे न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोटी बनावट पेमेन्ट स्लिप तयार करून मा. न्यायालयाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
या प्रकरणात श्री. अरविंद ललित सोमाणी (रा. खडकवासला, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश अजिनाथ बोराटे (रा. कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर मा. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटच्या अनुषंगाने, दमास इंडस्ट्रीज, शेड नं. १, नवले इंडस्ट्रियल इस्टेट, नऱ्हे, पुणे येथील कंपनीच्या नावाने जामीनदार म्हणून विक्रम भिमाजी धोंडगे (रा. कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) याच्या नावाची खोटी बनावट पेमेन्ट स्लिप तयार करून ती मा. न्यायालयात सादर करण्यात आली होती.
सदर बनावट पेमेन्ट स्लिपचा वापर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी गणेश अजिनाथ बोराटे व त्याचा साथीदार आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे यास दि. 23/01/2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या सदर आरोपी न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे दाखल आहे.
दरम्यान, खोटी बनावट पेमेन्ट स्लिप तयार करणारा मुख्य आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याचा शोध शिवाजीनगर पोलीस कसोशीने घेत आहेत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. सह पोलीस आयुक्त (सो.) श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (सो.) पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त (सो.) परिमंडळ-१ श्री. कृषीकेश रावले, तत्कालीन मा. सह पोलीस आयुक्त (सो.) श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिधावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, तसेच पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, सचिन जाधव, तेजस चापड, दीपक चव्हाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी येथील धर्मगुरू राधामोहन मिश्राविरुद्ध आणखी एक खटला | पुणे बातम्या

पुणे : जुलै 2025 मध्ये एका व्यक्तीवर (35) लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी सोमवारी...

वाकड मेट्रो स्टेशनला पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला चालना देण्यासाठी, शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 60-मीटर-लांब FOB मिळते....

पुणे : आगामी वाकड मेट्रो स्टेशनला मुंबई-बेंगळुरू महामार्गाच्या विरुद्ध बाजूस जोडणारा 60 मीटरचा फूट ओव्हरब्रिज (FOB) बसवण्यात आला आहे, ज्यामुळे स्टेशनवर पादचाऱ्यांचा...

त्याच्या बाजूला व्यावहारिक KU सह, मुकुंदचे डोळे आनंदी पुनरुत्थान. पुणे बातम्या

पुणे: अनौपचारिक क्रीडा चाहत्यांसाठी, त्यांची भागीदारी एक आकर्षक प्रयोग आहे: दोन माजी प्रतिस्पर्धी आणि जवळचे मित्र व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यापासून प्रशिक्षक आणि विद्यार्थी या...

सिया गोयलची कायदेशीर लढाई गुंतागुंतीची झाली: 2 वकील, 1 आरोपी आणि 10 कोटी रुपयांच्या...

अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव, साहिल गोयल, आरोपी सिया गोयल (एलआर) पुणे: अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव यांनी लोहगड हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हिच्यावर...

​पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलकडून विशेष सन्मान!

पुणे शहरात शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, ड्रग्स माफियांवर कठोर नियंत्रण आणणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल पुणे शहराचे...

error: Content is protected !!