आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने रेशन कार्ड व प्रमाणपत्राचे वाटप.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
स्व. उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसादनगरसह राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांसाठी येथील कऱ्हाड कॉर्नर ताहाराबाद रोडवर असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने राहुरी येथील तहसील कार्यालयाचे सहकार्याने रेशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न मोफत सोडविण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्या कॅम्पमधील लाभार्थ्यांना आप्पासाहेब ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने रेशन कार्ड व प्रमाणपत्राचे आज वितरण करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच नवीन व विभक्त शिधापत्रिका, दुबार शिधा पत्रिका, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, किंवा नाव कमी करणे आदी गोष्टींसाठी प्रसादनगर येथील नागरिकांना रोजंदारी बुडवून थेट राहुरी येथील तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत असे. येथील नागरिकांच्या मागणी नुसार आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचे वतीने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पमध्ये रेशन कार्ड मधील नाव कमी करणे १२ प्रकरणे, नाव समाविष्ट करणे १७ प्रकरणे, दुबार शिधापत्रिका ३ प्रकरणे, नवीन /विभक्त शिधापत्रिका ४ प्रकरणे, ऑनलाइन १२ अंकी साठी १४ प्रकरणे तसेच तीन एकल (विधवा) भगिनींनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि रहिवाशी तसेच उत्पन्न दाखले आदी इतर कामांसाठी या कॅम्पमध्ये जवळपास दीडशे प्रकरणांची पूर्तता करून कामे मार्गी लावण्यात आली. व पूर्तता झालेल्या नागरिकांना आज त्यांचे रेशन कार्ड व प्रमाणपत्राचे आप्पासाहेब ढूस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा संपर्क प्रमुख गणेश भालके, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे आदीं उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























