Homeताज्या बातम्यातुझे या भागात अति चालले आहे’, दोन गटात राडा, १३ जणांवर गुन्हे

तुझे या भागात अति चालले आहे’, दोन गटात राडा, १३ जणांवर गुन्हे

तुझे या भागात अति चालले आहे’, दोन गटात राडा, १३ जणांवर गुन्हे

पिंपरी (शशिकांत पाटोळे) | दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६ भोसरी एमआयडीसी परिसरातील खंडेवस्ती येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास बुद्ध विहारासमोर घडली.

याप्रकरणी परस्पराविरोधात गुन्हे दाखल केले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात रघुनाथ जिंबक आव्हाड (५२, खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राहुल उर्फ काळ्या रमेश प्रसाद (२४, खंडेवस्ती, भोसरी) याला अटक केली आहे. त्याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यातील अल्पवयीन असलेल्या तिघांना समजपत्र देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांना घेराव घातला आणि “तुझे या भागात अति चालले आहे, तुला आता ठार करतो” असे म्हणून लोखंडी पट्टीने डोक्यात वार केले. फिर्यादीचा आवाज ऐकून त्यांचे नातेवाईक वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी पट्टीने मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले असून राहुल उर्फ काळ्या याला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलांना समजपत्र देण्यात आले आहे.

याच्या परस्पर विरोधात सोनु बाबुलाल गौतम (१७, खंडेवस्ती, भोसरी) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रघुनाथ त्रिंबक आव्हाड (५०, खंडेवस्ती, भोसरी), समाधान दुधभाते (२५, खंडेवस्ती, भोसरी), ओमकार दुधभाते (२२, खंडेवस्ती, भोसरी), अविनाश दत्ता काकडे (२०, खंडेवस्ती, भोसरी) आणि एक महिला (४५, खंडेवस्ती, भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या मित्राला जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर “तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारले, तर महिला आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

error: Content is protected !!