Homeताज्या बातम्यामॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत

मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे भासवत विश्वास संपादन करून तब्बल २९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श प्रशांत म्हेत्रे (वय ३८ वर्षे) (उर्फ स्वप्नील वाल्के, उर्फ हेमंत गावकर, उर्फ जयेश पाटील), रा. अलीबाग, जि. रायगड (सध्या दुबई) याने मॅट्रिमोनियल साईटवर खोटी ओळख तयार करून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्री व विश्वास निर्माण करून विविध कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठी रक्कम उकळली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच आयटी अॅक्ट कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि आरोपीचा मागोवा घेतला.
तपासादरम्यान आरोपीला दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुण्यात आणून पुढील चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपीने विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार करून पैसे वळविल्याचे उघड झाले. यापैकी २१ लाख रुपये पोलिसांनी परत मिळवण्यात यश मिळवले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर करत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती नीला जनकिराम, तसेच संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनुज बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, तसेच पोलीस कर्मचारी पिलाने, कोंके, स्वप्नील पिंगळे, भगावत व ओंडूर घडकर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
🔎 पोलीसांचे आवाहन
मॅट्रिमोनियल किंवा सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहावे. कोणतीही खातरजमा न करता आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

error: Content is protected !!