Homeताज्या बातम्यासराईत गुन्हेगारांकडून धारदार लोखंडी शस्त्रे जप्त; पर्वती परिसरातील पुणे शहर गुन्हे शाखा...

सराईत गुन्हेगारांकडून धारदार लोखंडी शस्त्रे जप्त; पर्वती परिसरातील पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ ची धडक कारवाई

पुणे शहर (दि. ०६):
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घाजत असताना मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे धारदार लोखंडी शस्त्रे बाўगणारा एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण ८,५००/- रुपये किमतीची १२ धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
​घटनेची पार्श्वभूमी:
​दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना आणि पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी व महेश मंडलिक यांना गोपनीय बातमी मिळाली की, राम मंदिराच्या पाठीमागे, गल्ली नंबर ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे येथे गौरव कांबळे हा त्याच्या ३ मित्रांसोबत बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे घेऊन थांबलेला आहे.
​पोलीस कारवाई:
​मिळालेली गोपनीय बातमी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने जनता वसाहत, पर्वती, पुणे येथून मुख्य आरोपी गौरव राजू कांबळे (वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. ७७, जनता वसाहत, पर्वती, पुणे) यास त्याच्या ३ विधीसंघर्षित साथीदारांसह शस्त्रांसह ताब्यात घेतले.
​या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन पुणे येथे १ आरोपी आणि ३ विधीसंघर्षित बालकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा रजि. क्रमांक २५३/२०२६ नुसार आर्म अ‍ॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
​मार्गदर्शन व कारवाई करणारे पथक:
​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या उच्चाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
​मार्गदर्शक: अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे.
​कारवाई करणारे पथक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, म. पोलीस उप-निरीक्षक तेजश्री, तसेच पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, संदिप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे आणि विनायक वगारे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!