कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींना पुणे गुन्हे शाखेकडून सिनेस्टाईल पाठलाग करून अटक
पुणे: शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तीन आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून कर्नाटक राज्यात पळून जात असताना पळसदेव (ता. इंदापूर, जि. पुणे) परिसरात सोलापूर महामार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
नेमकी घटना आणि कारवाई:
शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२६ मधील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार शोध घेत होते. तपासादरम्यान पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार आणि महेश मंडलिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी मांजरी (पुणे) येथून खाजगी ट्रॅव्हल्सने कर्नाटक राज्यात पळून जात आहेत.
या माहितीच्या आधारे युनिट २ च्या पथकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपी सोलापूर रोडने हुमनाबाद (कर्नाटक) येथे जात असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने तातडीने पाठलाग करत दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पळसदेव (पुणे) येथे तिन्ही आरोपींना शिताफीने जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
१) रोहित काशिनाथ धोंगडे (वय २२ वर्षे, रा. दिगंबर हाईट्स, गंधर्व मंगल कार्यालयाशेजारी, अंजलीनगर, कात्रज, पुणे)
२) कुमार शिवाजी गाडे (वय २५ वर्षे, रा. तानाजी निवास बिल्डिंग, गणेश मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज, पुणे)
३) हर्षल ऊर्फ सोन्या रमाकांत साबळे (वय २४ वर्षे, रा. साबळे वाडा, किनारा हॉटेलच्या मागे, कात्रज, पुणे)
या पथकाने केली यशस्वी कामगिरी:
ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार, गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनांप्रमाणे करण्यात आली. या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे, तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, नागनाथ राख, विद्या शिंदे, आशिष यादव आणि विनायक वगारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























