Homeताज्या बातम्याEknath Shinde यांच्या नंदनवन निवासस्थानी शिष्टमंडळाची भेट; बोगस SRA प्रकरणात प्रकल्प रद्द...

Eknath Shinde यांच्या नंदनवन निवासस्थानी शिष्टमंडळाची भेट; बोगस SRA प्रकरणात प्रकल्प रद्द करण्याचे आदेश

मुंबई, प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, खराडी (पुणे 14) येथील गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित बोगस SRA प्रकरणी आंदोलनाला अखेर यश आले आहे. माननीय उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या मुंबई येथील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
अध्यक्ष राजेंद्र साळवे, सखाराम वामन रणपिसे, दिलीप नवगिरे, गीता ताई गायकवाड, सौ. मंगल गणवीर आणि सौ. सीमा हातागळे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बोगस SRA योजनेबाबत, रहिवाशांच्या मालकी हक्कांबाबत तसेच जळीतग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समक्ष फोन
भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत SRA प्रकल्प रद्द करण्याबाबत तात्काळ निर्देश दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी खडके साहेब यांना समक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मंत्रालयात या विषयावर लवकरच उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याचेही आश्वासन देण्यात आले.
तीन दिवसांच्या आंदोलनाची दखल
यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी ठाणे येथील निवासस्थानाबाहेर सलग तीन दिवस भेटीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर शासनस्तरावर चर्चा घडवून आणण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “नऊ महिन्यांपासून आम्ही न्यायासाठी लढत होतो. आज शासनाने आमची बाजू ऐकून सकारात्मक निर्णय घेतला, हे आमच्या संघर्षाचे यश आहे.”
पुढील दिशा
मंत्रालयात होणाऱ्या बैठकीनंतर पुढील प्रशासकीय निर्णय स्पष्ट होणार असून, रहिवाशांच्या मालकी हक्क व जळीतग्रस्तांना नुकसानभरपाई याबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार!

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? ६ हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदात केले १५ वार! पुणे; दि. २५ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार झाल्याची...

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश!

रॅपिडोवर (RTO) ची कडक कारवाई; बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्यात वैध बाईक टॅक्सी...

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून!

पुणे हिंजवडी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा प्रेम संशयातून प्रियकराकडून खून! पुणे; दि. २४ (शशिकांत पाटोळे) : पुण्याच्या आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

error: Content is protected !!