Homeताज्या बातम्यापिंपळे गुरवमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग

पिंपळे गुरवमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग

पिंपळे गुरवमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग

पिंपरी | दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६ येथील साठ फुटी रोडवरील भाऊनगर परिसरातील फर्निचरच्या गोडाऊनला सोमवारी दुपारी भीषण आग लागली होती. दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आग लागल्याने काही काळ परिसरात भीती व घबराटीचे वातावरण होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, रहाटणी उपअग्नी केंद्र तसेच भोसरी येथील पथके तात्काळ दाखल झाली. अरुंद रस्ते व दाट बांधकामांमुळे अडचणी येत असतानाही जवानांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमर अदियाल यांनी धाव घेतली. शेजारील घरांतील गॅस सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. तसेच, आग विझवण्यासाठी मदत केली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गोडाऊनच्या समोर आणखी चार गोडाऊन आहेत. त्या गोडाऊनपर्यंत आगीची झळ पोहोचली नाही. अन्यथा नुकसान अधिक वाढले असते.

घटनेनंतर सांगवी पोलिस ठाणे येथील सहायक पोलिस निरीक्षक नारायण पाटील तसेच नवी सांगवी येथील मार्शल राहुल कारंडे व हंसराज लंगर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तसेच, माहिती मिळताच आमदार शंकर जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नगरसेवक शशिकांत कदम व रवीना अंघोळकर उपस्थित होते. कर्मचारी विजय घुगे, गौतम इंगवले, शहाजी कोपनर, विशाल फडतरे, तेजस्वी पाटील, स्नेहा जगताप व करुणा थोरात आदी या कारवाईत सहभागी झाले होते.

*नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*
संबंधित ठिकाणी एकूण पाच गोडाऊन असून, त्यामध्ये लोखंडी साहित्य, स्क्रॅप, मंडप-डेकोरेशनचे साहित्य, लेझर कटिंग मशीन, ॲक्रेलिक नंबर प्लेटसाठी लागणारे साहित्य तसेच प्लायवुड व फर्निचरचा मोठा साठा होता. प्रारंभी लेझर कटिंग मशीन असलेल्या गोडाऊनमध्ये आग लागली आणि चारही गोडाऊन एकमेकांना लागून असल्यामुळे काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. दाट काळा धूर उसळू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली व घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे परिसरातील अरुंद रस्ते, अनियंत्रित बांधकामे व अग्निसुरक्षा नियमांचे पालन आदी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!