Homeताज्या बातम्याPune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसवर...

Pune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसवर कारवाई, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका

Pune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसवर कारवाई, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका

पुणे : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र पुणे यांच्या निवेदनाची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.
शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, रेल्वे आणि एसटीसोबतच खासगी ट्रॅव्हल्सकडे मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गांवर धावणाऱ्या खासगी बसांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक प्रमुख डॉ. विजयरभाऊ पंडित आणि प्रदेशाध्यक्ष संजयभाऊ बावळेकर आमिरभाई शेख
प्रशांतभाऊ कुमावत किरण बदे हेमंत गवळी सागर उपासनी सुरेश खलसे

यांनी दिनांक १३/०३/२०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
निवेदनात असे नमूद करण्यात आले की, काही वाहन वितरकांकडून नवीन वाहने नोंदणी न करता थेट ग्राहकांच्या ताब्यात दिली जात आहेत. तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या वाहनांद्वारे (ट्रॅव्हल्स) पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकरणात Dhone Automobile Pune यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती. संबंधित प्रकरणात २०१६ मध्ये वाहन नोंदणी न करता ग्राहकाला वाहन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१) यांनी दिनांक २०/०४/२०२६ रोजी आदेश काढत संबंधित प्रकरणात तपासणी करून दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या आदेशानुसार, पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या कारवाईमुळे खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच संबंधित वाहन वितरक आणि नियम मोडणाऱ्या घटकांवरही कारवाई करण्याची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी RTOची ही मोहीम महत्त्वाची ठरत असून, नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

error: Content is protected !!