Ranjangaon Ganpati येथे ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ किसान जागृती यात्रेचे भव्य स्वागत
पुणे;; देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू असलेली ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ किसान जागृती यात्रा दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असून, विविध संघटनांच्या वतीने यात्रेचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, शेतकऱ्यांच्या पुढील प्रमुख मागण्यांसाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे —
किमान आधारभूत किंमतीला (MSP) कायदेशीर हमी
संपूर्ण शेतकरी कर्जमाफी
उसाचा एफआरपी दर ६०० रुपये करणे
जमीन संपादन कायदा २०१३ पुन्हा लागू करणे
पीक विमा योजनेत सर्वसमावेशक सुधारणा
ही यात्रा ७ फेब्रुवारी २०२६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत देशभरातून प्रवास करत आहे. यात्रेचे नेतृत्व Jagjit Singh Dallewal, राष्ट्रीय संयोजक, Samyukt Kisan Morcha (गैर-राजकीय) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
डल्लेवाल यांनी दिल्ली सीमांवर शेतकरीविरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात १३ महिने चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनात नेतृत्व केले होते. तसेच २०१८ मध्ये रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यानंतरही त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करण्यासाठी १३१ दिवस उपोषण केले होते.
यात्रेच्या स्वागतानंतर मोरया लॉन्स, मंगल कार्यालय, रांजणगाव गणपती येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जगजीत सिंग डल्लेवाल शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात विविध प्रादेशिक शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, माहिती अधिकार संघटना, भ्रष्टाचारविरोधी संघटना तसेच सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
भवदीय,
शेतकरी संघटना
माहिती अधिकार संघटना
ग्राहक संघटना
स्वराज जनजागृती परिषद
ग्रामस्वराज प्रतिष्ठान
रांजणगाव गणपती ग्रामपंचायत
समस्त ग्रामस्थ
वारकरी सांप्रदाय, रांजणगाव गणपती

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























