अंगारक चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी
थेऊर | पौष महिन्यातील अंगारक चतुर्थीनिमित्त आज श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. पहाटे पुजारी महेश आगलावे यांच्या हस्ते श्रींची विधीवत पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा पार पडली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवस्थानतर्फे मंदिर प्रांगणात तसेच मंदिराबाहेर मांडव उभारण्यात आले होते. दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची तसेच इतर मूलभूत सोयींची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थानच्या वतीने उपवासासाठी भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. देठे महाराज शास्त्री (पैठण) यांचे सुभाष्य कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा भव्य छबिना काढण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला.
अंगारक चतुर्थीनिमित्त जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थानतर्फे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमावर देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस यांनी स्वतः लक्ष ठेवले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























