Homeताज्या बातम्याऑनलाइन टास्क’पासून ‘मनी लॉन्ड्रिंग’पर्यंत नवे डाव

ऑनलाइन टास्क’पासून ‘मनी लॉन्ड्रिंग’पर्यंत नवे डाव

ऑनलाइन टास्क’पासून ‘मनी लॉन्ड्रिंग’पर्यंत नवे डाव

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; १९ फेब्रुवारी २०२६ : कधी जादा परताव्याचे आमिष, पोलिस अधिकारी असल्याचा बनाव रचून, तर कधी डेटा सुरक्षेच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक होत आहे. शहरात तिघांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या असून, त्यामध्ये दोन ज्येष्ठांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १९ डिसेंबर रोजी वानवडीतील एका ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. स्वतःला पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात दाखवत तुमच्या बॅंक खात्याचा वापर ‘मनी लॉन्ड्रिंग’ च्या प्रकरणात झाला आहे. याबाबत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अटक करण्याची धमकी दिली. बॅंक खात्यांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाच्या बॅंक खात्यांची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी दबाव टाकून एक कोटी २७ लाख ५३ हजार रुपये विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत. दुसऱ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी १३ जानेवारी रोजी एरंडवणातील एका ७० वर्षीय नागरिकाशी मोबाइलवर संपर्क साधला. ‘पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऑफिसर’ असल्याचे भासवत तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे पाठवली जात आहेत. तुमचा प्रतिबंधित संघटनेशी संबंध असून, बॅंक खात्याद्वारे दीड कोटींची फसवणूक झाल्याचे सांगितले. आर्थिक गुन्ह्यात चौकशी सुरू असल्याचा बहाणा करण्यात आला. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीवर दबाव टाकून दोन कोटी रुपये विविध खात्यांत वर्ग करून घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संगीता देवकाते करीत आहेत.

अन्य एका प्रकरणात सायबर चोरट्यांनी पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने खराडीतील ३३ वर्षीय व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांना ‘ऑनलाइन टास्क’ पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला कमी रकमेवर नफा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘ ऑनलाइन टास्क’च्या नावाखाली मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. बनावट ॲप, खोटे डॅशबोर्ड आणि ऑनलाइन व्यवहारांचा आभास निर्माण करून ११ लाख रुपये इतकी रक्कम उकळली.

सायबर गुन्हेगारांकडून बनावट ओळख, खोटी कागदपत्रे, व्हिडिओ कॉल, अधिकृत वाटणारे लोगो आणि ॲपचा वापर करून नागरिकांना मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकले जाते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कमी वेळात नफ्याच्या शोधात असलेले तरुण लालसेपोटी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी कॉल्स, सरकारी चौकशीच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करणे किंवा जादा परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

*सायबर चोरट्यांची गुन्ह्याची पध्दत*

आधी विश्वास संपादन

त्यानंतर भीती किंवा जादा नफ्याचे आमिष

शेवटी मोठ्या रकमेचे ऑनलाइन व्यवहार

*फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा*

कोणतीही सरकारी यंत्रणा तपासासाठी पैसे मागत नाही.

जादा परताव्याच्या आश्वासनावर तत्काळ निर्णय घेऊ नका.

आधार, पॅन कार्ड, बँक तपशील किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका.

संशयास्पद लिंक, ॲप किंवा क्यूआर कोड स्कॅन करू नका.

फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण, न्याय एक न संपणारी प्रतीक्षा: डेटा | पुणे...

पुणे : महाराष्ट्रात दर तासाला एका मुलाचे लैंगिक शोषण होत असल्याचे राज्यातील 2023 च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. हे फक्त नोंदवलेले आकडे आहेत....

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

error: Content is protected !!