Homeताज्या बातम्यागद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

गद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

पुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा फुटीर खासदारांनी जनादेशाशी आणि शिवसैनिकांच्या भावनांशी केलेल्या विश्वासघाताच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या कंटोनमेंट विभागाच्या वतीने रस्ता पेठ येथील पॉवर हाऊस चौकात तीव्र व आक्रमक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान गद्दार खासदारांच्या राजकीय मयतीचे प्रतीक म्हणून तिरडी आणण्यात आली होती. मात्र पोलिस प्रशासनाने तिरडी ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. आंदोलनस्थळी घोषणाबाजीने वातावरण तापले होते.
“तिरडीला सुरक्षा देणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांनी जनादेशाशी गद्दारी करणाऱ्या खासदारांविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आगामी काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
सदर आंदोलनाचे आयोजन विभागप्रमुख उत्तम भुजबळ यांनी केले होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहरप्रमुख वसंत मोरे, गटनेते नितीन गावडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, कविता सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, आबा निकम, प्रशांत राणे, चंदन साळुंके, युवासेना शहर संघटक युवराज पारिख, वैभव दिघे, परेश खांडके, प्रतीक आल्हाट, दिलीप पोमण, विजय नायर, नितीन निगडे, गणेश लडकत, जगदीश दिघे, अजय भुवड, वीरेंद्र गायकवाड, नागनाथ शिंदे, नरेंद्र दरोडे, मारुती ननवरे, रमेश परदेशी, परवेश राव, मोहन दुधाणे, भरत शेडगे, संजय वाल्हेकर, मुरली विणकर, सुनील राजगोंडा, नितीन दलभंजन, बाबा परदेशी, आबा मोडक, शरद गुप्ते, सोनू पाटील, राहुल चिंदम, सचिन पगरिया, गोरख चव्हाण, अनिल परदेशी, सचिन चिंचवडे, दिलीप व्यवहारे, सोहम जाधव, चिंतामण मुंगी, पवन कांचन, नीरज नांगरे, अनिल जाधव, निहाल सोरटे, योगेश पवार, नितीन जगताप, हेमंत जोशी, आपा शेलार, दत्ता पवार, शुभम पवार, सुनील हळंदे, वीरेश अडगळे, नागेश खडके, दत्ता घुले, गौरव सिन्नरकर, बाळासाहेब पायगुडे, प्रवीण रणदिवे, मकरंद पेटकर, शरद चौधरी, आनंद बेंद्रे, राहुल शेडगे, संजय लाहोट, सूरज मोराळे, मिलिंद पत्की, राहुल बायस, श्रीनिवास कराड, शाम चिखले, चंद्रकांत इंदुलकर, नंदू जांभळे, काका लडकत, रोहित लगाडे, मनीष जाधव, सुनील गायकवाड, शुभम शिंदे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी एकमुखाने सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. जनादेशाचा अपमान करणाऱ्या फुटीर खासदारांविरोधात शिवसेनेचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार” २०२५-२६ महाराष्ट्रातून ‘राज्यातील स्वच्छ शहर’ या क्षणीत पिंपरी चिंचवड शहराने पटकावला...

"स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार" २०२५-२६ महाराष्ट्रातून 'राज्यातील स्वच्छ शहर' या क्षणीत पिंपरी चिंचवड शहराने पटकावला प्रथम क्रमांक! दिल्ली; दि.१२ (शशिकांत पाटोळे) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि...

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ मुंबई दि.११ (शशिकांत पाटोळे) : मंत्रालय आणि विधानभनाच्या कँटिनमध्ये आता पौष्टिक खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मंचाव...

​सासवडमध्ये इलेक्ट्रोनिक व कापड दुकान फोडणारी चोरटी जेरबंद; २ लाख ९३ हजार ४०० रुपयांचा...

सासवड (पुरंदर): सासवड हद्दीतील रिलायन्स पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या 'रुद्र इलेक्ट्रीकल शॉप' आणि एका कापड दुकानाचे शटर उघडून दुकानातील कॉपर वायर, रोख रक्कम व महागडे शर्ट चोरणाऱ्या...

साई मेरीगोल्ड सोसायटीतील फ्लॅटला आग; आगीदरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट अग्निशमन दलाकडून आगीवर तातडीने नियंत्रण...

पिंपरी, दि. ९ नोव्हेंबर २०२६ :* पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमधील ए-७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे संवेदनशील स्थळांवर विशेष लक्ष आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी विशेष पथकामार्फत...

पिंपरी, दि. ७ नोव्हेंबर २०२६:* दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा, तसेच सणाच्या कालावधीत आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी पिंपरी...

error: Content is protected !!