नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य युवराज काकडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप; कामाला उत्साहात सुरुवात.
हवेली तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी निवडून आल्यावर समाजाभिमुख उपक्रम राबवत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे (Senior Citizen Card) वाटप करून आपल्या कामाची सुरुवात केली. थेऊर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक कार्डांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले हे ओळखपत्र मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बोलताना युवराज काकडे यांनी सांगितले की, “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या सोडविणे आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.” पुढील काळात आरोग्य शिबिरे, प्रलंबित पेन्शन प्रकरणे तसेच ग्रामविकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नव्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
आरोग्यदूत युवराज काकडे यांनी एक महिन्यापूर्वी आळंदी, कुंजीरवाडी, थेऊर, कोलवडी, मांजरी, आव्हाळवाडी या गावांत शिबिर आयोजन केले होते त्यामध्ये 500 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. थेऊर व कुंजीरवाडी या गावांचे कार्ड वाटप पूर्ण झाले आहे. कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांचे कार्ड वाटप, जिल्हा परिषद सदस्य कोमल संदेश आव्हाळे व पंचायत समिती सदस्य सुषमाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच होणार असल्याचे आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























