Homeताज्या बातम्यापुणे शहर सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्प – खोदाई परवानगी प्रक्रियेत गंभीर विसंगती

पुणे शहर सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्प – खोदाई परवानगी प्रक्रियेत गंभीर विसंगती

पुणे शहर सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्प – खोदाई परवानगी प्रक्रियेत गंभीर विसंगती

पुणे :
पुणे शहरातील सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्पांतर्गत रस्त्यांची खोदाई व पोल फाऊंडेशनच्या परवानगीसंदर्भात मोठ्या प्रमाणात विसंगती व प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

पार्श्वभूमी

दिनांक ८ मे २०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीसीटीव्ही बसवण्यासाठी रस्ता खोदाईसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यावेळी केवळ ६ किमी खोदाईस तात्पुरती चर्चा झाली होती. तसेच रस्त्यांचे पुनर्निर्माण (Reinstatement) हे ICCC या संस्थेकडूनच करण्यात येणार असल्याचा ठोस निर्णय घेण्यात आला होता.

ठेकेदाराची वाढीव मागणी

तथापि, Allied Digital Services Ltd. या कंपनीने मनपाकडे नंतर तब्बल २८ किमी खोदाईची परवानगी मागितली. एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदाई केल्यास रस्त्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मनपाच्या पथ विभागाकडे उपलब्ध नसल्याने प्रशासनावर मोठा आर्थिक भार येणार होता.

पावसाळ्यात खोदाई बंदीचा भंग

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण शहरात खोदाईस बंदी असतानाही Allied Digital कडून विशेष परवानगी मागवली गेली. पावसाळ्याच्या काळात ही परवानगी प्रक्रिया कशी झाली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आयुक्तांची मान्यता

सदर प्रकरणात सविस्तर प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी आयुक्तांनी परवानगी मंजूर केली, मात्र विविध अटींसह –

वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता

राडारोडा तातडीने साफ करून रस्ता पुर्ववत करणे

काम टप्प्याटप्प्याने आणि मनपा अभियंता यांच्या देखरेखीखाली करणे

कामाचे बोर्ड लावणे बंधनकारक

आगामी अडथळा – Pune Grand Challenge Tour 2026

जानेवारी २०२६ मध्ये पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची Pune Grand Challenge Tour (PGCT 2026) ही सायकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी मनपा ऑक्टोबर २०२५ पासून शहरातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण सुरू करणार आहे. त्यामुळे या मार्गावरील खोदाई कामांना संपूर्ण बंदी असेल.

गंभीर प्रश्न

पावसाळी बंदी असताना परवानगी देण्यामागे नेमका दबाव कुणाचा होता?

सुरुवातीला ६ किमीचा विषय असताना तो अचानक २८ किमीपर्यंत कसा गेला?

ICCC कडून पुनर्निर्माणाचे ठरवूनही, त्याचा भार मनपावर टाकण्याचा प्रयत्न का झाला?

आंतरराष्ट्रीय स्पर्धा माहिती असूनही नियोजनात अशा विसंगती का घडल्या?

मागणी

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे.

📌 Crime Maharashtra Live News
पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​गाडेगव्हाण बनले ‘नशेचे अड्डे’! दारू-गांजाच्या अवैध धंद्याने गाव हादरले

संतप्त ग्रामस्थांचा जालना SP कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा; जाफ्राबाद तालुक्यात खळबळ जाफ्राबाद (प्रतिनिधी) : जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या...

चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिलेला जखमी करणारा आरोपी चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत गजाआड!!

​पुणे, दिनांक २५ मे २०२६: पुणे शहर पोलिसांच्या वाघोली पोलीस स्टेशनने एका धाडसी कारवाईत, चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिला प्रवाशास जखमी करणाऱ्या आणि चोरीच्या दुचाकीवरून...

पुण्यात बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या बेकायदा औषध विक्रीचा पर्दाफाश; पोलिसांकडून सराईत गुन्हेगार...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक ०२ ने एका धडक कारवाईत बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांची (इंजेक्शन) बेकायदेशीर विक्री...

​सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई: रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त

​पुणे: सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने परिसरात गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना एका मोठ्या गुन्ह्याचा कट उधळून लावला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका १८...

वाहन जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड; तब्बल १४ गुन्हे उघडकीस!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने एका मोठ्या कारवाईत वाहन जाळपोळ प्रकरणातील पाहिजे असलेल्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीच्या...

error: Content is protected !!