महादजी शिंदे हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब गंगाधर नलावडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
[प्रतिनिधी | पुणे]
महादजी शिंदे हायस्कूलमधील ज्येष्ठ व आदरणीय शिक्षक श्री. बाळासाहेब गंगाधर नलावडे सर यांचे दि. 3/1/2026 रोजी पुणे कॅन्टोन्मेंट येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत
आहे.
स्व. बाळासाहेब नलावडे सर यांनी 1989 साली कलाशिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊन अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले. शिस्तप्रिय, शांत स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राथमिक व हायस्कूलच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. कश्मिरा मॅडम, शाळेतील इतर शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. हनिफभाई शेख यांनी उपस्थित राहून स्व. नलावडे सर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत रमजान शेख तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित
होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. नलावडे सर यांच्या शैक्षणिक कार्याचा, विद्यार्थ्यांवरील प्रभावाचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























