पुणे:
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत वाहन चोराला जेरबंद करण्यात यश मिळवले असून, त्याच्याकडून १ तीनचाकी रिक्षा आणि १ युनिकॉर्न दुचाकी अशी एकूण अडीच लाख रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगाराकडील वाहन चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर हे वाहन चोरांचा शोध घेत होते. गस्त घाजत असताना पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम चोरीची रिक्षा घेऊन सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे थांबला आहे.
या माहितीच्या आधारे नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे छापा टाकला. तिथे आरोपी चेतन राजु जाधव (वय २६ वर्षे, रा. सुरज दर्शन सोसायटी, राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार, पुणे) हा तीनचाकी रिक्षा (क्रमांक MH 12 FC 2270) सह मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरची रिक्षा त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली, ज्यामुळे ती रिक्षा जप्त करण्यात आली. नमूद आरोपीकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी गाडी (क्रमांक MH 12 SJ 5124) देखील चोरल्याचे निष्पन्न झाले, जी पोलिसांनी तात्काळ जप्त केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपशीलवार माहिती:अ.क्र.गुन्हे नोंद क्रमांक (गुरनं)कलमजप्त वाहनकिंमत (अंदाजे)
१३४२/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)रिक्षा नंबर MH12FC2270१,५०,०००/- रु.
२३४३/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)युनिकॉर्न दुचाकी गाडी MH12SJ5124१,००,०००/- रु.
एकूण——आरोपी पाहिजे असलेले इतर गुन्हे:
नमूद आरोपी हा खालीलप्रमाणे इतर ३ गुन्ह्यांमध्ये हवा (पाहिजे) होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:अ.क्र.गुन्हे नोंद क्रमांक (गुरनं)कलम
१३१८/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)
२३१९/२०२६भा.न्या.सं.क. ३०३(२)
३४७४/२०२५भा.न्या.सं.क. ३०३(२)पोलीस पथक व मार्गदर्शन:
सदरची ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांच्या सूचनांप्रमाणे, पोलीस उप-निरेक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























