पुणे, हवेली – वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, तिच्या नातेवाईकांनी थेट राज्य महिला आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. “वेळेवर कारवाई झाली असती, तर वैष्णवी आज जिवंत असती,” असे मयूरी, वैष्णवीची जाऊ, हिने सांगितले.


मयूरी हिने महिला आयोगाला ईमेलद्वारे तक्रार करून वैष्णवीवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. त्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, वैष्णवीच्या सासऱ्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले, छातीजवळ हात लावून तिचे कपडे फाडले, शिवीगाळ केली. याचे पुरावे म्हणून तिने एफआयआर, छायाचित्रे आणि वैष्णवीच्या आईने लिहिलेली चिठ्ठी महिला आयोगाकडे पाठवली होती.
विशेष म्हणजे, त्या चिठ्ठीत असा उल्लेख आहे की, “आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे.” हा उल्लेख अत्यंत गंभीर असून, कारवाईस अडथळा निर्माण करणारा असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सर्व पुरावे, तक्रारी असूनही महिला आयोगाने यावर कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? हा प्रश्न आता उभा राहिला आहे.
वैष्णवीच्या मृत्यूला कोण जबाबदार?
हा केवळ कौटुंबिक वाद होता की त्यामागे सत्तेचा गैरवापर? महिला आयोगाचे उत्तर, पोलिस तपास आणि प्रशासनाची भूमिका याबाबत समाजमाध्यमांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही वैष्णवीचा आवाज दाबला जाणार नाही.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















