Homeताज्या बातम्या"सीना नदीला महापूर : माधा-करमाळ्यातील गावांना स्थलांतराचे आदेश"

“सीना नदीला महापूर : माधा-करमाळ्यातील गावांना स्थलांतराचे आदेश”

माढा व करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय हवामान खात्याने (मुंबई कोलॅब) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अहमदनगर व धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीना कोलगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगवती नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पूरस्थितीमुळे करमाळा व माढा तालुक्यातील खालील गावांमध्ये पाणी शिरलेले असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे :
➡️ करमाळा तालुका – निलज, बोरगाव, खडकी, बितरगाव श्री, तरटगाव, अलजापूर, अवती, पोटेगाव, बाळेवाडी, लाहू, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, पापनस, रिधोरे, तंदुळवाडी, निमगाव मा. महातपूर, दारफळ, सुलतानपूर (राहुलनगर), केवड, उंदरगाव, वाकव, खैरव, कुंभेज, लोणी, कावे, महादेववाडी, म्हैसगाव, मानेगाव.

➡️ माधा तालुका – वरील गावांमध्ये पूरपाणी शिरलेले असून, संपूर्ण वस्त्यांमध्ये धोका निर्माण झालेला आहे.

🔹 हवामान खात्याने 26, 27 व 28 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर, अहमदनगर व धाराशिव जिल्ह्यात आणखी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच, पाण्यामुळे विषारी साप, विंचू आदी प्राणी वस्त्यांमध्ये घुसण्याचा धोका आहे.

🔹 त्यामुळे सीना नदीकाठी व आसपासच्या वस्त्यांमधील सर्व नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचा आदेश मा. उपविभागीय अधिकारी, माधा विभाग, कुडुवाडी सौ. जयश्री अवहाद यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (3) अन्वये दिला आहे.

👉 आदेशानुसार, पूरपाण्याने वेढलेल्या वस्त्यांमध्ये किंवा पूराच्या पाण्याच्या उच्चतम पातळीपासून 500 मीटर परिसरात पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशबंदी लागू राहील.

👉 सर्व नागरिकांनी हा आदेश गांभीर्याने घ्यावा. अन्यथा, आदेश मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

🛑 सर्व नागरिकांना आवाहन :
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी हलवावे. पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवेश करु नये. जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

भारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची सुटका

पुणे : मसाज सेंटरवर छापा – ५ महिलांची सुटका, दोन आरोपींवर गुन्हा दाखल पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी...

टँकर चालकांकडून दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका. पुणे बातम्या

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

error: Content is protected !!