पुणे: पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलमे ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी अत्यंत वेगळ्या आणि धक्कादायक पद्धतीने करण्यात आलेल्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे.
तक्रारदार यांच्या स्नॅपचॅट (Snapchat) खात्यावर “प्रिन्सिका जोशी” नावाच्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. सदर रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तक्रारदार व संबंधित स्नॅपचॅट वापरकर्ता यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर तब्बल सहा ते सात महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरून नियमित संवाद सुरू होता.
क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
या मैत्रीचा विश्वास संपादन केल्यानंतर “प्रिन्सिका जोशी” हिने तक्रारदार यांना क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा व आकर्षक परतावा मिळतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमधून (Crypto Wallet) समोरच्या व्यक्तीच्या क्रिप्टो वॉलेटवर १४६८ युएसडीटी (USDT), अंदाजे १,५०,००० रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर केली. मात्र, काही कालावधीनंतर तक्रारदार यांनी Cryptocurrency मध्ये झालेली वाढ, गुंतवणुकीचा परतावा व पैसे परत मिळण्याबाबत वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर “प्रिन्सिका जोशी” या नावाने संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने आपले स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले तसेच संपर्क टाळण्यास सुरुवात केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी तात्काळ सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे धाव घेतली.
तांत्रिक तपासातून बंडाळी आणि आरोपी गजाआड
सदर Cryptocurrency फसवणूक गुन्ह्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्याने सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
तांत्रिक तपासादरम्यान कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५ वर्षे, रा. पर्वती परिसर, पुणे) हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता; तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये फसवणूक करणारी व्यक्ती ही ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी असल्याचे नमूद होते, तर तांत्रिक तपासातून ‘कुणाल अदमाने’ नावाच्या पुरुषाचा संबंध समोर येत होता. या विरोधाभासामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला असला, तरी सायबर पोलिसांनी ताकदीने तपास करून मुलीच्या आवाजात गळा घालून फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ सायबर चोराला अखेर आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























