दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहर पोलिसांच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चैन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला सराईत आरोपी आणि त्याच्या आंतरराज्यीय साथीदारांना जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून एकूण ३७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, त्यांनी पुण्यात घरफोडीचे एकूण ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत फिर्यादी घरी नसताना अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि कारवाई:
सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांना दिले होते. त्यानुसार तपास पथकातील अंमलदारांना योग्य सूचना देण्यात आल्या.
तपास पथकातील पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित आरोपी हे उंड्री पिसोळी परिसरात आले आहेत. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना सांगितल्यानंतर, त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व पोलीस स्टाफने उंड्री पिसोळी परिसर पिंजून काढला. आरोपी सराईत असल्याने सतत जागा बदलत होते. ते त्यांच्या ताब्यातील दुचाकी गाडीवरून उंड्री पिसोळी येथील डोंगराच्या रोडने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्टाफने त्या गाडीला चारही बाजूने घेराव घालून छापा टाकला आणि आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ते:
१) शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २७ वर्षे, रा. स.नं. ११०, कोठारी व्हील्सच्या पाठीमागे, रामटेकडी, हडपसर, पुणे)
२) रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६ वर्षे, रा. अजवार रोड, एकता नगर, बडोदा राज्य, गुजरात)
३) अक्षयसिंग उर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय २२ वर्षे, रा. बिराजदार नगर, हडपसर, पुणे)
४) सोनसिंग शाखासिंग शिकलीगर/तीलपिटीया (वय २२ वर्षे, रा. अजवार रोड, एकता नगर, बडोदा राज्य, गुजरात)
चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपासात त्यांनी पुणे शहरात एकूण ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
उघडकीस आलेले एकूण ०९ गुन्हे:
१) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. १२६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४).
२) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. २२८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४).
३) विश्रांतवाडी पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. ३६८/२०२६, भारतीय न्याय संहिता ३३१(४), ६२, ३(५).
४) काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. ४९९/२०२५, भारतीय न्याय संहिता ३०५, ३३१(३), ३३१(४).
५) काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. २६/२०२६, भारतीय न्याय संहिता ३०५(अ), ३३१(१), ३३१(२).
६) दत्तवाडी पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. ३०७/२०२२, भादवि कलम ४५७, ३८० अन्वये.
७) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ११०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये.
८) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. १११/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये.
९) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ११३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये.
या आरोपींकडून जवळपास ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मार्गदर्शन व सहभागी पोलीस पथक:
सदरची यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परि-०१) श्री. हृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भिंगारदिवे, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रमेश लाहिगुडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी तसेच तपास पथकातील स्टाफमधील सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशिकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार आणि नितीन बाबर यांनी ही कामगिरी केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























