Homeताज्या बातम्याघरफोडी करून चोरी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास लक्ष्मीनगर पोलिसांकडून ताब्यात; ७६,७०० रुपयांचा मुद्देमाल...

घरफोडी करून चोरी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास लक्ष्मीनगर पोलिसांकडून ताब्यात; ७६,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे:
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळवणे तसेच हद्दीत पेट्रोलिंग करून संशयित इसमांची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
​याच पार्श्वभूमीवर, दिनांक ०६/०८/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या आदेशानुसार लक्ष्मीनगर तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार व पथकातील अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल परदेशी व किरण भागीत यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून, बालाजीनगर (येरवडा) येथून एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले.
​त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने बिडी कामगार वसाहत येथील दोन घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून डेल कंपनीचा लॅपटॉप, बॅग, हेडफोन, वन प्लस कंपनीचा मोबाईल, स्पीकर, तांब्याचा हंडा आणि १ ग्रॅम सोन्याचे बेनटेक्सचे गंठण असा एकूण ७६,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
​या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे खालीलप्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत:
​गु.र.नं १४५/२०२६ भा.न्या.सं कलम ३०५ (अ), ३३१ (३)
​गु.र.नं ९५/२०२६ भा.न्या.सं कलम ३०५
​सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार (पोहवा / ३०३५) मयुर सूर्यवंशी हे करत आहेत.
​मार्गदर्शन व सहभाग:
सदर धडाकेबाज कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिषेत्र ०४) श्री. चिलुमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नीलकंठ जगताप यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि पोलीस अंमलदार यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भीमराव कांबळे, सुरज ओंबासे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, किरण भागीत, अमोल वायाळ, अक्षय शिंदे व सचिन कुचेकर यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!