पुणे:
सन २०२३ व २०२४ या वर्षांकरिता केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) प्राप्त झालेल्या महाराष्ट्र राज्यातील २२ पोलीस अधिकाऱ्यांचा पदक प्रदान समारंभ महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ०८/०८/२०२६ रोजी पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
पार्श्वभूमी व स्वरूप
सन २०१८ पासून केंद्रीय गृहमंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ देण्यात येत होते. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदकाचा समावेश ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ मध्ये केला आहे.
सन २०२३ व २०२४ करिता महाराष्ट्र राज्यातील एकूण २२ पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक प्राप्त झाले असून, यामध्ये:
२ पोलीस अधीक्षक
४ पोलीस उपअधीक्षक
९ पोलीस निरीक्षक
६ सहाय्यक पोलीस निरीक्षक
१ पोलीस उपनिरीक्षक
या सर्व अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र पोलीस दलातून शिफारसी पाठविण्याकरिता पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे:
अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना, महाराष्ट्र राज्य)
विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम)
विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.), गु.अ.वि., पुणे
निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्राप्त झालेल्या शिफारस अहवालांची निकषांनुसार पडताळणी होऊन एकूण २२ पोलीस अधिकारी यांचे शिफारस अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येतात. त्यापैकी राज्यातून दरवर्षी ११ पोलीस अधिकारी यांची केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) यासाठी निवड करण्यात येते.
गुन्हे उघडकीस आणण्याचे कौशल्य
पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, खंडणी, सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हे, जबरी चोरी, अपहरण व लैंगिक अत्याचार, लहान मुलांचे खंडणीसाठी अपहरण, क्रिप्टो करन्सी फ्रॉड, लहान मुलांचा अनैतिक व्यापार, ज्येष्ठ नागरिकांवरील हल्ले आणि सायबर गुन्हे यांसारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने, आधुनिक तपास पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करून उघडकीस आणले आहेत. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी पुरस्कार प्राप्त सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
समारंभास उपस्थित मान्यवर
या सोहळ्यास खालील विविध वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते:
श्री. सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
श्री. विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर)
श्री. दीपक पाण्डेय (अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान)
श्री. सुहास वारके (अपर पोलीस महासंचालक, सुधारगृह)
श्री. सुनील फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे पूर्व)
श्री. सुधीर हिरेमठ (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे पश्चिम)
श्री. श्रीकांत पाठक (विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे)
श्री. दत्तात्रय शिंदे (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र)
श्री. अमोघ गावकर (पोलीस उपमहानिरीक्षक, प्रशासन)
श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
श्रीमती शफकत आमना (पोलीस अधीक्षक, पुणे पदक, अतिरिक्त कार्यभार कायदा व संशोधन)
डॉ. श्री. दिनेश बारी (पोलीस अधीक्षक, तांत्रिक सेवा)
याशिवाय इतर पोलीस अधिकारी, पदक विजेते अधिकारी यांचे कुटुंबीय तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होतेसन २०२३ पुरस्कारप्रात्र अधिकारी व गुन्ह्यांची थोडक्यात माहिती
श्री. गिरीष रमेश सोनवणे (पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे): अमरावती नगर रचना विभागातील सहसंचालकांच्या संपत्तीचा अपसंपदा भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणून, ५५ कोटी १२ लाख १९ हजार सातशे एकसष्ट रुपये किंमतीची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली व ४०००० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
श्री. राहुल रावसाहेब धस (सहा. पोलीस आयुक्त, रबाळे, नवी मुंबई): पुणे ग्रामीण (यवत पोलीस ठाणे) मधील एकाच कुटुंबातील ७ जणांच्या हत्याकांडाचा छडा मोबाईल सीडीआर व सायबर विश्लेषण याद्वारे लावून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
श्री. अभिजीत सुरेश शिवथरे (अपर पोलीस अधिक्षक, रायगड): पालघर (कासा पोलीस ठाणे) मधील दरोड्याच्या गुन्ह्यात साध्या वेषात सापळा रचून ३ आरोपींना अटक केली व चोरीस गेलेली मालमत्ता व पिस्टल जप्त केले.
श्री. हेमंत विजय बेंडाळे (सहा. पोलीस निरीक्षक, धुळे): जि.पी. फायनान्सच्या माध्यमातून ३४% व्याजाने कर्ज देऊन, घराचे मूळ कागदपत्र परत न करणाऱ्या कंपनीवर ५ ठिकाणी छापा टाकून एकूण २२,६६,६१,३१९/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
श्री. नितीन केशवराव जाधव (सहा. पोलीस आयुक्त फोर्स वन मुंबई): मुंबईतील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा छडा लावून डीएनए प्रोफाइलिंग व पुराव्यांच्या आधारे आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली.
श्री. संदिप बाबुराव मिटके (सहायक पोलीस आयुक्त क्राईम ब्रॉन्च, नाशिक शहर): अहिल्यानगर (श्रीरामपूर) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व वेश्याव्यवसायासाठी विकल्या प्रकरणाचा तपास करून मोका अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आणि पीडितेच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला.
श्री. शेखर रामदास बागडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एलसीबी क्राईम ठाणे): मानपाडा ठाण्यांतर्गत ११ वर्षांच्या मुलाच्या १ कोटी रुपयांच्या खंडणी अपहरणाच्या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेष याद्वारे ७४ तासांच्या आत गुजरातमध्ये छापा टाकून बालकाची सुटका केली.
श्री. उत्कर्ष अशोक वझे (पोलीस निरीक्षक, सेंट्रल सायबर पोलीस ठाणे, मुंबई): इंटरनेटवरून विषारी धातू (आर्सेनिक व थैलियम) मागवून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पती व सासूच्या केलेल्या हत्येचा पर्दाफाश केला.
श्री. अंकुश भालचंद्र चिंतामण (पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर): सायबर गुन्ह्यांच्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून कोटींच्या क्रिप्टो चलना (Crypto Currency) अपहार करणाऱ्या प्रकरणाचा ब्लॉकचेन लेजर व फॉरेन्सिक टूल्सद्वारे छडा लावून ६ कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी जप्त केली.
श्री. विजयसिंह रामचंद्र भोसले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवी मुंबई): ज्वेलर्स शॉपमध्ये १,३९,२१,०७७/- रुपयांच्या दागिन्यांच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही व सीडीआर विश्लेषणाव्दारे राजस्थानमधून आरोपींना अटक करून १ कोटींचे दागिने हस्तगत केले.
श्रीमती ज्योत्स्ना विलास रासम (सहा. पोलीस आयुक्त वाकोला डिव्हीजन, मुंबई): साकिनाका परिसरातील सुरक्षा रक्षकाकडून उघडकीस आलेल्या खूनी हल्ल्याच्या व अनुसूचित जाती/जमातीच्या कायद्यांतर्गत गुन्ह्यात तत्परतेने पुरावे गोळा करून आरोपीस अटक केली.
सन २०२४ पुरस्कारप्रात्र अधिकारी व गुन्ह्यांची थोडक्यात माहिती
श्री. शंकर विठ्ठल शेळके (पोलीस उप अधिक्षक, जात पडताळणी विभाग, वाशिम): जळगावच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील ३ कोटी ८० लाख रुपयांच्या सोने आणि रोख रकमेच्या जबरी चोरीचा क्लिष्ट गुन्हा अवघ्या ८१ दिवसांत उघडकीस आणून माल हस्तगत केला.
श्रीमती रेखा सागर संकपाल (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सीआयडी, संभाजीनगर): नागपूर येथील ५ दिवसांच्या बाळाच्या विक्री प्रकरणाचा २४ तासांत छडा लावून एकूण १४ मुलांना परत मिळविले व महाराष्ट्रात प्रथमच मोका कायदा लावला.
श्री. सिध्देश दिलीप जोष्टे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई): ताडदेव परिसरातील सराफाच्या घरातील १,८९,६५,४१०/- रुपयांच्या जबरी चोरीचा गुन्हा नोकराच्या मदतीने झाल्याचे निष्पन्न करून २४ तासांत उघड केला.
श्रीमती राधिका गिरधर भावसार (सहा. पोलीस निरीक्षक, परभणी): लहान मुलांच्या अपहरणाच्या ३ गुन्ह्यांमध्ये परराज्यातील टोळीचा शोध घेऊन ११ आरोपींना अटक केली व ५ अपहृत मुलांची सुटका केली.
श्री. समीर प्रकाश लोणकर (पोलीस निरीक्षक, मुंबई): उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलद्वारे २० कोटींची धमकी देणाऱ्या आरोपीचा Protonmail, Tor व VPN विश्लेषणाव्दारे शोध घेऊन गुजरातहून अटक केली.
श्री. दिनेश त्र्यंबक लबडे (पोलीस निरीक्षक, चिमुर): प्रेमसंबधाच्या वादातून मुलाच्या हत्या व डोके कापण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली.
श्री. पंकज विनय चक्रे (पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण): नागपूर ते अमरावती दरम्यान टोल नाक्यांचे व मोबाईल टॉवरचे डंप डेटा विश्लेषण करून २४ तासांच्या आत खून प्रकरणातील आरोपींना अटक केली.
श्री. मनोज श्रीराम चौधरी (पोलीस निरीक्षक, नागपूर शहर): झोपडीत एकटी असलेल्या मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न व हत्या प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक करून आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली.
श्री. विवेकानंद बलभिम पाटील (पोलीस निरीक्षक, लातुर): नांदेड येथील मंदिरात ११ वर्षांच्या बालकाच्या खून प्रकरणातील आरोपीला शोधून अटक केली, ज्यामध्ये न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
श्री. उमेश शामराव बोरसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नाशिक): मक्याच्या शेतात मिळालेल्या कुजलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा छडा लावून पत्नी व तिच्या प्रियकराने केलेल्या हत्येचा भांडाफोड केला व पोरबंदर येथून अटक केली.
श्री. कृषिकेश प्रदीप रावले (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१ पुणे शहर): १७ वर्षीय मुलाने बहिणीच्या प्रियकराची हत्या व बहिणीचा खून केल्याच्या ऑनरकिलिंग प्रकरणात वकिलासह १३ आरोपींना अटक केली आणि ५ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























