अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन त्याचा खुन करुन पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत पश्चिम बंगाल येथुन अटक
दिनांक १०/०२/२०२५ रोजी रात्री ००/३५ या चे पूर्वी स.नं. २८ तोरणा मोहर बिल्डिंग, चिंतामणी चौकाचे जवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यायर फ्लैट क्रमांक १०४ मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने, सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्याग गंभीर जखमी करुन त्याचा खून केला आहे म्हणुन राहुल लक्ष्मण आवारी नेमणुक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ११४/२०२५ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये गुन्हा आला आहे.
दाखल गुन्हयातील मयत इसमाची बॉडी ही DICOMPOSE होवु लागल्यामुळे मयताचे चेहरा नीट दिसत नव्हता मयताबाचत घटनास्थळावरील नागरीकांकडे विचारणा केली असता मयत इसमाबाबत काही उपयुक्त माहीती मिळाली नाही. त्यामुळे मयत इसमास ओळखणे हे पोलीसांना कठीण झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यावरुन मयत इसमाचे नाव नयन गोरख प्रसाद, वय ४५ वर्षे, रा. मुळ रा. गाव दुमडा, तहसील तारवारा, जि. सिवान, विहार असे असल्याची खात्री झाली. त्यापुढे मयत इसम नयन गोरख प्रसाद याचे मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोवत विरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर, वय ३० वर्षे, रा. बजे विंडोल, विंडोले, रायगंज, परीयाल, उत्तर दिनाजपुर, पश्चिम बंगाल ७३३१५६ हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. आरोपी बिरण सुबल करकर, ऊर्फे बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा, पश्चिम बंगाल येथे दिनांक १२/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. विवेक मासाळ सो, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सम्पाले, निलेश खखैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, यांच्या पथकाने केली आहे.
(

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.