पुणे:
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक ०२ ने एका धडक कारवाईत बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांची (इंजेक्शन) बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २७,४५३/- रुपये किमतीच्या ८२ प्रतिबंधित इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
गोपनीय बातमीदाराकडून मिळाली माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक २३/०५/२०२६ रोजी रात्री २३:०० वाजेपासून ते दिनांक २४/०५/२०२६ रोजी पहाटे ०२:०० वाजेपर्यंत काळेपडळ पोलीस स्टेशन (परिमंडळ ०६) च्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि गस्त (पेट्रोलिंग) सुरू होती. यादरम्यान गुन्हे शाखेचे युनिट ७ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, तसेच खंडणी विरोधी पथक ०२ चे पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले आणि किरण पडयाळ हे हिंगणे मळा, हडपसर परिसर येथे पेट्रोलिंग करत होते.
या गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. हडपसर येथील हिंगणे मळा, वलई सोसायटी समोर आकाश डांग माळी यांच्या मालकीच्या पत्र्याच्या खोलीत एक भाडेकरू बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित इंजेक्शन विकत असल्याची ती माहिती होती.
अशी झाली कारवाई
बातमी मिळताच पोलिसांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला जागीच शिताफीने पकडले.
अटकेत असलेल्या आरोपीचे नाव अभिषेक खंडु भडंगे (वय २५ वर्षे, रा. हिंगणे मळा, हडपसर, पुणे) असे असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या झडतीत पोलिसांना नशेकरीता आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जाणारे MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA नावाचे एकूण २७,४५३/- रुपये किमतीचे ८२ नग (बाटल्या) विनापरवाना बाळगलेले मिळून आले.
गुन्हा दाखल आणि पूर्वेतिहास
याप्रकरणी आरोपी अभिषेक खंडु भडंगे याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७५, २७८, १२५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २३७/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास काळेपडळ पोलीस स्टेशन करत आहे. पकडलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर एकट्या हडपसर पोलीस स्टेशनमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची यशस्वी कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने:
मा. श्री. संजय दराडे (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)
मा. श्रीमती तेजस्वीनी सातपुते (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)
मा. श्री. गौहर हसन (पोलीस उप आयुक्त, गुन्हे)
मा. श्री. राजेंद्र मुळीक (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २)
यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक श्री. राम राजमाने यांच्या सूचनेनुसार:
युनिट ७ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले आणि किरण पडयाळ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,

















