Homeताज्या बातम्याबाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार!
शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या वतीने, शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकूण १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून त्यांना अभिवादन करण्याचा संकल्प शिवसेना-युवासेनेच्या वतीने करण्यात आला. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.

या रक्तदान शिबिरास शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, माजी आमदार महादेव बाबर, शिवसेना गटनेते नितीन गावडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारीख, माजी नगरसेवक प्रशांत बधे, युवासेना शहरप्रमुख राम थरकुडे, युवराज पारीख, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख भरत कुंभरकर, संतोष गोपाळ, किशोर राजपूत, उमेश वाघ, सचिन पासलकर, राजेंद्र शिंदे, शिवाजी मते, नितीन वाघ, मकरंद पेठेकर, विभागप्रमुख चंदन साळुंके, चंद्रकांत इंगुलकर, दिलीप पोमान, संदीप गायकवाड, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, सचिन चिंचवडे, नंदू येवले, संदीप गरुड, ज्ञानांद कोंढरे, धनंजय देशमुख, योगेश पवार, मनीष जाधव, प्रतीक आल्हाट, विजय रावडे, हेमंत जोशी, नवनाथ शिंदे, दत्ता करपे, संतोष भुतकर, नंदू जांभळे, सूर्यकांत पवार, जुबेर शेख, अभिषेक जगताप तसेच
युवासेनेचे परेश खांडके, गौरव गायकवाड, सागर दळवी, सोहम जाधव, गौरव पापळ, रुपेश थोपटे, लोकेश जानगवळी, सिद्धेश वाळुंज, रोहित कुचेकर, गौरव शिंदे, चिंतामणी मुंगी, अमोल डोईफोडे, अंकित अहिरे, अमर काची, आदित्य काटे, सनी भोर, नीरज नांगरे, रमेश परदेशी, स्वप्निल भालेराव, ऋषी डोईफोडे, कैवल्य डोईफोडे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
तसेच आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, महिला आघाडीच्या विजया मोहिते, करुणा घाडगे, दीपाली राऊत, सोनाली जुनवणे, संगीता भिलारे, रोहिणी कोल्हाळ यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेबांचे विचार केवळ भाषणातून नव्हे, तर समाजोपयोगी कृतीतून जिवंत ठेवणे, हीच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खरी आदरांजली आहे. १०७ रक्तदात्यांनी केलेले रक्तदान म्हणजे १०७ कुटुंबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारा सेवाभावी उपक्रम ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरी चोरी करून पसार आरोपीला अटक; येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे, दि. २० नोव्हेंबर २०२६: येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ व मारहाण करत जबरी चोरी करून पसार झालेल्या आरोपीला येरवडा...

येरवड्यात अंमली पदार्थ विरोधी पथक आणि लक्ष्मीनगर पोलिसांची संयुक्त कारवाई; ८५ हजार ५४० रुपयांचे...

पुणे: शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध पुणे पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त...

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसरमध्ये झालेल्या ४७ लाखांच्या घरफोडीचा छडा; गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून ३८...

पुणे (प्रतिनिधी): दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसर परिसरात झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट ६ ला मोठे यश...

ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या सुवर्णसंधी पिंपरीत ‘ऑटोमोटिव्ह फ्यूचर अँड मोबिलिटी समिट २०२६’...

पुणे : आधुनिक वाहनांमध्ये वाढत्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे 'ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा' हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र बनले आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी...

error: Content is protected !!