पुणे: शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध पुणे पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने येरवडा परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८५,५४० रुपये किमतीचा ५.१८ ग्रॅम वजनाचा ‘मॅफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
सलमान इम्तीयाज मोहम्मद पठाण (वय ३४ वर्षे, रा. सर्वे नंबर १२, गजराज मित्र मंडळाजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण हे त्यांच्या पोलीस स्टाफसह लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी येरवड्यातील राज चौक, लक्ष्मीनगर येथील ‘के क्लॉथ पॅलेस’ समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी सलमान पठाण हा आपल्या गाडीवर बसून संशयास्पदरीत्या हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलीसांची चाहूल लागताच आरोपी तेथून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पेट्रोलिंग करत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथक (गुन्हे शाखा, पुणे शहर) आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्कता दाखवत त्याला जागीच घेराव घालून ताब्यात घेतले. त्यानंतर पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एकूण ८५,५४० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला, ज्यामध्ये ५.१८ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली संयुक्त कारवाई:
सदरची ही यशस्वी कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या प्रत्यक्ष कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा, पुणे शहर) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, पोलीस अंमलदार योगेश कुंभार, संदिप देवकाते, शरद धांडे, सुमित यादव, महिला पोलीस अंमलदार सुरेखा साबळे, सुकेशिनी आंबले आणि पोलीस अंमलदार देविदास वांढरे तसेच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन (पुणे शहर) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस अंमलदार लोखंडे, शिंदे आणि कांबळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























