Homeताज्या बातम्याविश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली...

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच इतर जिल्ह्यांमधील एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि समांतर तपास
विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.नं. २२३/२०२६, भा.न्या.सं.क. ३०३ (२) नुसार, फिर्यादी यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी (नं. एम.एच. ३७ ए बी ३८७२) चिमणबाग सोसायटी, टिळक हॉटेल, नवीन पेठ, पुणे येथे २३ जून २०२६ रोजी रात्री १२:३० वाजता लॉक करून पार्क केली होती. रात्रीच्या वेळी ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी आपल्या टीमसह समांतर तपास सुरू केला.
​आरोपींची धरपकड आणि तपासातील उलगडा
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीनुसार, नारायण पेठेत दोन संशयित इसम थांबले असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने तिथे जाऊन खात्री केली. पाहणी करताना वर्णनानुसार दोन मुले दिसली, त्यापैकी एक इसम अंधाराचा फायदा घेऊन गल्लीबोळातून पळून गेला, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास एका दुचाकीसह पकडण्यात आले. नातेवाईकांसमक्ष चौकशी केली असता, त्याने साथीदाराच्या मदतीने पुणे व इतर ठिकाणांहून गाड्या चोरी करून त्यातील दोन गाड्या कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६ वर्षे, रा. अहमदपूर, लातूर) यास विकल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे कृष्णा शेळके यास लातूर येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली.
​उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल
तिन्ही आरोपींनी मिळून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १४ मोटार सायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत:
​विश्रामबाग पोलीस स्टेशनकडील २ गुन्हे
​समर्थ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
​हडपसर पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
​भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
​विमानतळ पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा
​काळेवाडी पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड)कडील १ गुन्हा
​इतर जिल्ह्यांमधील ५ गुन्हे
​सध्या इतर २ मोटार सायकलींचा तपास सुरू असून, विधीसंघर्षीत बालक व त्याच्या साथीदारांकडून एकूण १४ चोरीच्या मोटार सायकली असा जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पसार झालेल्या पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे.
​मार्गदर्शन व तपास पथक
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०१, पुणे शहर) श्री. कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग, पुणे शहर) श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनखाली पार पडली. तसेच विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भिंगारदिवे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रमेश लाहिगुडे यांच्या सूचनांनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस उप-निरीक्षक मेहबुब मोकाशी, आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड व उमेश गव्हाणे यांनी ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

error: Content is protected !!