Homeताज्या बातम्याअरुण पवार यांची मागणी : पिंपळे गुरव, सांगवीत 'पे अँड पार्क' सुरू...

अरुण पवार यांची मागणी : पिंपळे गुरव, सांगवीत ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडी सोडवावी ..

अरुण पवार यांची मागणी : पिंपळे गुरव, सांगवीत ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडी सोडवावी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कार्यकारी संपादक
सागर लोहार+91 98815 15725

पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्र. २९ आणि ३१ सोबतच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तात्पुरते ‘पे अँड पार्क’ सुरू करून वाहतूक कोंडीची समस्या सोडववण्यात यावी. या माध्यमातून युवकांना रोजगार आणि महापालिकेला आर्थिक फायदा मिळू शकतो, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.
याबाबत अरुण पवार यांनी महापालिकेच्या वाहतूक व दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंते सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी संजय गायके, किशोर अट्टरगेकर, मालोजी भालके, श्रीकृष्ण जाधवर, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. नागरिक नाइलाजाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली वाहने पार्क करत आहेत. यामुळे प्रभाग क्र. २९ व ३१, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह अनेक भागात तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
प्रभाग क्र. २९ (सुदर्शन नगर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव), प्रभाग क्र. ३१ (नवी सांगवी, जुनी सांगवी), पिंपरी चिंचवड शहरातील आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे कंपाऊंड उभे करून त्या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू करण्यात यावी.
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि नागरिकांची सोय होईल. ‘पे अँड पार्क’ केंद्रांच्या व्यवस्थापनातून शहरातील गरजू युवक-युवतींना रोजगार मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्किंग शुल्क आकारणीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही अरुण पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!