क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पुणे मनपा कार्यालयाबाहेर निदर्शने. मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट; कारवाईचे संकेत
पुणे – पुणे महानगरपालिका क्रीडा विभागातील गंभीर भ्रष्टाचार, अनियमित कंत्राटे, मनपा मालमत्तेचा अनधिकृत ताबा , सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक २७ मधील सानेगुरुजी नगर येथील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा गैरव्यवहारांविरोधात महाविकास आघाडी, प्रभाग क्रमांक 27 यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले, यावेळी भ्रष्ट क्रीडा विभाग अधिकार्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यामुळे पुणे महानगर पालिकेच्या बाहेर काही काळ तणाव निर्माण झाल होता.
आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन क्रीडा विभागातील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर पुणे येथील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे संकेत दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून तातडीने चौकशी सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे अनंत घरत म्हणाले धर्मादाय आयुक्त न्यायालयाने ५००० रुपयांचा दंड ठोठवून अनियमित ठरविलेल्या मंडळास तसेच खोटा मंडळाचा उपाध्यक्ष देऊन क्रीडा विभागासोबत केलेल्या करारात उपनिबंधक कार्यालयाची म्हणजेच शासनाची, पुणे मनपाची तसेच करदाते पुणेकरांची सत्ताधारी भाजप नगरसेवकाने, पक्षाच्या एका मुख्य पदाधिकाऱ्याने फसवणूक केली आहे आणी त्यास क्रीडा विभाग तत्कालीन उपायुक्त हे ही तेवढेच जबाबदार आहेत .
तर युवक काँग्रेस चे सागर धाडावे म्हणाले आयुक्तांनी तत्पर सदर विषयात लक्ष घालून प्रशासन हे निपक्ष काम करते हे दाखवून द्यावे आणी पालिकेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्हाला सदर विषयात न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील .
शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत प्रशासनाला कळविले की –
• क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराचे संरक्षण उखडून टाकले पाहिजे
• मनपा मालमत्तेचा अनधिकृत वापर थांबला पाहिजे
• अधिकारी–सत्ताधारी संगनमत
…हे सर्व प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
प्रशासनाने तातडीने ठोस पावले न उचलल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी आंदोलनास अनंत घरत-प्रसिद्धी प्रमुख पुणे शिवसेना,
सागर धाडावे -सरचिटणीस युवक काँग्रेस, डॉ मदन कोठुळे शहरध्यक्ष- राष्ट्रवादी श प क्रीडा विभाग पुणे,
पुणे महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता शिंदे, शिवसेना माजी गटनेता अशोक हरणावळ, दिलीप पोमण, कुणाल काळे, नंदू वीर, संदीप काळे, किरण गायकवाड, अभिजीत बारवकर, युवराज दिसले, निलेश वाघमारे, गणेश घोलप, प्रतीक अल्हाट, रवी भोसले, सूरज खंडाळे, मंगेश जाधव, आदित्य इंदुलकर, फारुक शेख, राहुल गाळिंदे, इम्रान पठाण, विनय ओव्हाळ, प्रतीक गाळींदे, उदय निगडे, उपस्थित होते.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























