पुणे क्राईम ब्रांच युनिट-६ ची कारवाई : आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त
पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-६ कडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर प्रभावी कारवाई करत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. �
Crime Unit-6 Press Note & Image Dt 24.04.2026..pdf
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर युनिट-६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण टिळेकर, पोलीस अंमलदार सागर जगताप, अंकित कोंडे, महिला पोलीस अंमलदार महेश लाडके, गणेश गावडे व उमेश शेलार हे पथक पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगून परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रसाद उर्फ संदीप रामदास आंबोरे (वय २८, रा. रावळवाडी, बबनवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे विवेक मासाळ तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























