Homeताज्या बातम्यापुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे शहराने घेतला मोकळा श्वास

पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे शहराने घेतला मोकळा श्वास

पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे शहराने घेतला मोकळा श्वास

पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगरसेवक निवडणुकीनंतर पुणे शहराने जणू मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी सुमारे सहा महिने इच्छुक उमेदवारांनी पुणे शहरभर मोठ्या प्रमाणावर होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले होते. शहरात फ्लेक्स लावण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसतानाही थेट फुटपाथवर बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आले होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सा. का. सचिन भोसले यांनी दिली.
निवडणूक काळात लावण्यात आलेल्या फ्लेक्सपैकी सुमारे ९० टक्के फ्लेक्स पूर्णपणे बेकायदेशीर होते. या बेकायदेशीर फ्लेक्समुळे पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, अपघाताचा धोका वाढला तसेच पुणे शहराच्या सौंदर्यावर मोठा आघात झाला. मात्र या सर्व प्रकाराकडे पुणे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंगवर प्रभावी कारवाई केली नाही. कागदोपत्री कारवाई झाल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात ९० टक्के अनधिकृत फ्लेक्सवर कोणतीही कारवाईच होत नाही, असा गंभीर आरोपही सा. का. सचिन भोसले यांनी केला आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, मतदान झाले, काही निवडून आले तर काही पराभूत झाले. मात्र या संपूर्ण कालावधीत पुणे महानगरपालिका अक्षरशः झोपेत असल्याचे चित्र दिसून आले. आता निवडणूक संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जाणार नाहीत, हे जरी खरे असले तरी निवडणूक काळात नागरिकांना झालेल्या त्रासाचा हिशोब कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण घटनेतून पुणे महानगरपालिकेने बोध घ्यावा व यापुढे शहरात लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व होर्डिंगवर कडक नजर ठेवून तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा अतिक्रमण विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच फुकट पगार घेणाऱ्या आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जे अधिकारी नागरिकांना न्याय देत नाहीत, त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ठाम मत सा. का. सचिन भोसले यांनी व्यक्त केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २, फुलेनगर, नागपूर चाळ येथील फुटपाथवर लावलेल्या अनधिकृत बॅनर तसेच बॅनरच्या साठ्याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरूरमध्ये मोठी कारवाई: ६१ किलो गांजा आणि स्कॉर्पिओ कारसह आरोपी जेरबंद

​पुणे ग्रामीण: 'नशामुक्त भारत अभियान' आणि 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात धडक कारवाई करत मोठी यश मिळवले...

युनिट-३ गुन्हे शाखा, पुणे शहरची मोठी कारवाई: गावठी पिस्टल व काडतुसांसह दोन सराईत आरोपी...

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर २०२६: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेले गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि दुचाकीसह दोन जणांना...

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!