Homeताज्या बातम्यारक्षक नगर फेज वन गृहनिर्माण संस्था, खराडी येथे बेकायदेशीर पुनर्विकास प्रक्रिया –...

रक्षक नगर फेज वन गृहनिर्माण संस्था, खराडी येथे बेकायदेशीर पुनर्विकास प्रक्रिया – सभासदांची फसवणूक व भूखंड हडप करण्याचा गंभीर आरोप

रक्षक नगर फेज वन गृहनिर्माण संस्था, खराडी येथे बेकायदेशीर पुनर्विकास प्रक्रिया – सभासदांची फसवणूक व भूखंड हडप करण्याचा गंभीर आरोप

पुणे शहरातील खराडी परिसरातील रक्षक नगर फेज वन गृहनिर्माण संस्था ही सन 2000 साली स्थापन झाली असून या संस्थेमध्ये एकूण 319 सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. यामध्ये टेरेस फ्लॅट, गार्डन फ्लॅट, 1 बीएचके व 2 बीएचके अशा विविध प्रकारच्या सदनिका अस्तित्वात आहेत.
सन 2019 साली त्या वेळेस अस्तित्वात असणाऱ्या संचालक मंडळाने संस्थेच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरच्या काळात संपूर्ण पुनर्विकास प्रक्रिया ही सभासदांना विश्वासात न घेता, पारदर्शकता न ठेवता व कोणतीही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न करून राबविण्यात आल्याचा गंभीर आरोप अनेक सभासदांनी केला आहे.
दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी बांधकाम व्यवसायिक निवडण्याची प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आली असल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात येत आहे. सदर प्रक्रियेदरम्यान सर्व सभासदांना कोणत्याही प्रकारची माहिती, कागदपत्रे, आर्थिक तपशील अथवा विकास कराराचे मसुदे देण्यात आले नाहीत.
या सभेत अनेक सभासदांनी उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर लेखी व तोंडी हरकती नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या हरकती स्वीकारण्यात आल्या नाहीत, तसेच सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता प्रक्रिया पुढे नेण्यात आली.
यावेळी संबंधितांकडून असे सांगण्यात आले की, एकूण सभासदांपैकी 60 टक्के सभासदांनी बांधकाम व्यवसायिकाची निवड केली आहे, मात्र याबाबत कोणतेही वैध पुरावे, स्वाक्षरी यादी किंवा अधिकृत कागदपत्रे सभासदांना दाखविण्यात आलेली नाहीत.
या बेकायदेशीर प्रक्रियेच्या विरोधात अनेक सभासदांनी स्वाक्षरीसह लेखी आक्षेप नोंदवले असून, आमची फसवणूक, आमच्या हक्काच्या जागेची चोरी, तसेच भूखंड हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठोस आरोप करत आहोत.
या प्रकरणात मेरिट कन्सल्टन्सी कंपनी तसेच ज्यांनी कोणी बेकायदेशीररीत्या बांधकाम व्यवसायिकाची नेमणूक केली आहे, त्या सर्वांच्या विरोधात आम्ही योग्य त्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून कायदेशीर मार्गाने न्याय मागणार आहोत.
⚠️ नागरिकांना जाहीर आवाहन
जोपर्यंत आम्हाला या प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत रक्षक नगर फेज वन, खराडी येथे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक गाळे अथवा रहिवासी गाळे खरेदी, बुकिंग किंवा गुंतवणूक करू नये, असे आवाहन आम्ही सर्व नागरिकांना करीत आहोत.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून, भविष्यातील कोणतीही गुंतवणूक ही कायदेशीर अडचणीत सापडू शकते, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
👉 न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च परताव्याच्या आमिषाने किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या मान...

एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात....

NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

error: Content is protected !!