थेरगाव–कोळवडी नदी पुलावर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा लोणीकाळभोर पोलिसांकडून जीव वाचविण्यात यश
लोणीकाळभोर (पुणे), दि. ०९/०१/२०२६ :
थेरगाव–कोळवडी नदी पुलावर नदीत उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेचा लोणीकाळभोर पोलिसांनी प्रसंगावधान व कर्तव्य तत्परता दाखवत जीव वाचविला आहे.
दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ०५.०० वाजता लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव पोलीस चौकीत एक इसम धावत येऊन माहिती दिली की, थेरगाव–कोळवडी नदी पुलावर एक महिला नदीत उडी मारण्याच्या तयारीत उभी आहे. सदर माहिती मिळताच पोलीस चौकीतील महिला पोलीस अंमलदार पो.हवा. ६९११ वैशाली नागवडे तसेच पोलीस शिपाई ताम्हणे व पोलीस शिपाई धुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिला नदी पुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ तिला ताब्यात घेतले व सुरक्षितरित्या थेरगाव पोलीस चौकी येथे आणले. चौकशीदरम्यान सदर महिलेने आपले नाव वैष्णवी सुरेश पांडगाळे, वय २५ वर्षे, रा. भाडळे वस्ती, कोळवडी, ता. हवेली, जि. पुणे असे सांगितले. तसेच तिने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करण्याचा विचार केल्याचे सांगितले.
महिलेची मानसिक स्थिती लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व महिला पोलीस हवा वैषाली नागवडे यांनी समुपदेशन करत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यानंतर तिच्या पतीशी संपर्क साधून महिलेला सुरक्षितरित्या त्याच्या ताब्यात देऊन घरी पाठविण्यात आले.
लोणीकाळभोर पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एका महिलेचा अनमोल जीव वाचला असून या कर्तव्यतत्पर कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ–०६, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), म.पो.उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पो.हवा. ६९११ वैशाली नागवडे, पोलीस शिपाई ताम्हणे, धुळे, महिला पोलीस शिपाई कदम, मपोशी खोत व मपोशी पोकळे यांनी केली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























